शैक्षणिक

या कारणाने शिक्षिका आणि शिक्षकात झाली फ्रिस्टाईल 

Spread the love

बिहार / नवप्रहार डेस्क

                   शाळा जेथे शिक्षणाचे धडे दिले जातात. ज्या ठिकाणी देशाचे भविष्य घडवले जाते. त्या शाळा आता भलत्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध होत आहेत. काही शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार होत आहेत तर काही शाळेत शिक्षक स्वतःच भांडत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याची जरा ही तमा न बाळगता शिक्षक शाळेतच गैरवर्तन करत आहेत.

                 सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक पुरुष आणि महिला शिक्षिकेला भांडताना दिसत आहे.  एक महिला खुर्चीवर बसलेल्या पुरुषांच्या शर्टाची कॉलर धरून मारहाण करत आहे. या घटनेबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, हा व्हिडीओ बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बरौली येथील आहे.

Nold दोन्ही शिक्षकांचा सुट्टीवरून वाद झाला.

महिला शिक्षक सहकारी शिक्षकासोबत सु्ट्टीवरून भांडत आहे. शिक्षक खुर्चीवर बसलेला आहे. तर महिला शिक्षक उभी आहे. शिक्षकाची कॉलर धरून शिक्षिका मारताना दिसत आहे. तर शिक्षक महिलेचे हात हात धरण्याचा प्रयत्न करत आहे. बाजूला उभे असलेले लोक त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

 

 

यूजर्संच्या मजेशीर कमेंट

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर यूजर्संनीही मजेशीकर कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, ‘भविष्यात नकार देण्याआधी विचार करतील.’ दुसऱ्याने ‘स्वतः भांडत आहेत आणि मुलं मजा करत असतील.’, ‘आता दोघांना कायमची सुट्टी मिळेल’, असे तिसऱ्याने म्हटले आहे. एकाने म्हटले आहे की, ‘तुमचीच अवस्था अशी आहे, तर तुम्ही मुलांना काय शिकवाल?’

एक्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या हा व्हिडीओ १ लाख १० हजारांहून अधिक लोकांनी बघितला आहे. तर १ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ १२७ लोकांनी रिपोस्ट केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close