विशेष

या कारणावरून अल्पवयीन मुलीने टाकली 7 व्या माळ्यावरून उडी 

Spread the love

देहू / नवप्रहार मीडिया 

                   मोबाईल हा आता लहाण्यांपासून मोठया पर्यंतचा अविभाज्य अंग बनला आहे. मोबाईल विसरलो किंवा तो नादुरुस्त झाला तर काही तरी हरवल्यासारखे वाटते. किशोरवयीन मुले तर मोबाईल च्या ईतक्या आहारी गेली आहेत की त्यांना मोबाईल शिवाय जगणे कठीण होऊन बसले आहे. मुलांची मागणी पूर्ण केली नाही तर  ते टोकाचे पाऊल उचलण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. अशीच घटना देहू येथे घडली आहे.

या मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. सातव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती दहावीच्या वर्गात शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याचे वडील गणेश सावंत आणि आई दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते मूळचे सांगोला येथील आहेत. कामानिमित्त ते देहूत राहतात. सावंत दाम्पत्याला दोन मुली होत्या. त्यात आर्या मोठी मुलगी होती.

बुधवारी रात्री जेवण झाल्यावर आर्याने आईकडे मोबाईल मागितला मात्र आईवडिलांनी मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या आर्या हिने त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डाक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close