विशेष

या कारणामुळे रेव्ह पार्टीत वापरले जाते सापाचे विष एल्विश यादव च्या अडचणीत वाढ

Spread the love

              उच्चभ्रु सोसायटीत रहाणाऱ्या कुटुंबातील लोकांना ही पार्ट्या ची सवय असतेच. तीच सवय या कुटुंबातील तरुण पिढीला देखील पडते. धनाढ्य कुटुंबातील तरुण – तरुणींना आता रेव्ह पार्टीचा नशा चढला आहे. पूर्वी अश्य पार्टी मध्ये कोकेन,  हेरॉईन ,मॉर्फिन यासारखे ड्रग्स वापरले जायचे. पण नशेची सवय जडलेल्या अश्या लोकांना जेव्हा या ड्रग्स मध्ये मजा येत नव्हता तर त्यांनी सापाचे विष वापरणे सुरू केले.

 मागील दिवसात बिग बॉस चा विजेता आणि प्रसिद्ध YouTuber एल्विश यादव याच्या घरी कोब्रा जातीचे विषारी साप आढळून आले होते. तेव्हा त्याला हे साप का पाळले याचे स्पष्टीकरण देता आले नव्हते. पण चौकशी नंतर त्याने साप त्याचे विष काढून ते विकण्यासाठी पाळले असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडाच्या रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी कोब्रा क्रेट प्रजातीचे विष वापरले जात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी भाजप खासदार मनेका गांधी यांच्या एनजीओने एल्विश यादवसह काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पकडलेल्या सापांचे विष एफएसएल लॅबमध्ये पाठवले होते. चाचणीसाठी पाठवले. त्याचे परिणामही समोर आले असून, त्यामुळे आता एल्विश यादवच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

अशा परिस्थितीत सापाच्या विषामुळे नशा कशी होते, आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये त्याची मागणी का वाढली आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आजकाल रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी कोकेन, हेरॉईन आणि मॉर्फिनचाच वापर होत नसून, सापाच्या विषाचा वापरही वाढला आहे.

सापाच्या विषाचा वापर अँटी व्हेनम म्हणून केला जातो हे तुम्ही ऐकले असेलच, पण त्यामुळे होणाऱ्या नशाबद्दल कधी ऐकले आहे का? यासाठी सापाच्या विषाचा एक छोटासा डोस घेतला जातो, ज्यामुळे मेंदू सुन्न होतो.

सापाच्या विषापासून बनवलेला नशा इतर नशांपेक्षा वेगळा असतो. ते बनवताना अत्यंत काळजी घेतली जाते आणि ही नशा दारू किंवा ड्रग्जपेक्षा जास्त काळ टिकते. इंडियन जर्नल ऑफ फिजियोलॉजी अँड फार्माकोलॉजीमधील अभ्यास पाहून सापाच्या विषाचा शरीरावर होणारा परिणाम समजू शकतो.

अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, मुलाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुलगा बेशुद्ध होता तेव्हा त्याला हवेत उडत असल्याचा भास झाला. साप चावल्यानंतर 7 दिवसांनीच ती पूर्णपणे सामान्य झाली यावरून तुम्ही यातून निर्माण झालेल्या नशाचा अंदाज लावू शकता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close