ती आत्महत्या नसून तो ब्लॅकमेलिंगचा बळी

मुंबई / नवप्रहार मीडिया
मुंबईच्या सांताक्रुझ येथील गुरुद्वारात ऐका युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण त्याचा पत्नीने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी मृतकाचा मोबाईल तपासला असता त्यात आढळून आलेल्या व्हिडिओ ची चौकशी केली असता हा ब्लॅकमेलिंग चां प्रकार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या साठी दोषी असलेल्या युवकांना राजस्थान येथून अटक केली आहे.
९ ऑगस्ट २०२३ रोजी मानसिंग पवार या तरुणाने गुरुद्वारात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. कुठल्यातरी मानसिक कारणामुळे मानसिंग ने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. पण पत्नीने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी हत्येचा दिशेने तपास करण्यासाठी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता. त्यांना त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले.
अधिक तपास केला असता त्याचे मोर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ आढळून आले होते. त्यामुळे हा सेक्सटॉर्षण चां प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले . हे व्हिडिओ आरोपींनी त्याला व्हाट्सअॅपवर पाठवले होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींकडून मानसिंगला देण्यात आली होती. तसेच ही धमकी देऊन आरोपींनी मानसिंगकडून ५६ हजार रूपये उकळले होते. विशेष बाब म्हणजे दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवत मानसिंगला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून आणखीण खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न सुरु होता. या प्रकरणी मानसिंगच्या पत्नीने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना या घटनेचा तपास करत असताना यामध्ये सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा दाट संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खंडणीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि इतक पुराव्यावरून राजस्थानच्या डिग जिल्ह्यातून तोहिद जाफर अली (२२), वारीस जाफर अली (१९) यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.तसेय या आरोपींकडून पाच मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपींचा कसून तपास केला असता त्यांनी घटनेची उकल केली. तसेच आरोपींनी याआधी देखील अनेकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.