क्राइम

एका ‘ केसा ‘  मुळे लागला मर्डर  ‘ केस’ मधील खुन्याचा शोध

Spread the love

मुंबई  / नवप्रहार मीडिया 

                एखादे मर्डर प्रकरण असे असते की खुनी मागे कोणताही पुरावा सोडत नाही. किंवा एखाद्या शुल्लक गोष्टीकडे तपास अधिकाऱ्याचे लक्ष जात नाही.अथवा तपास अधिकारी त्या बाबी कडे फारसे लक्ष देत नाही.पण एखाद्या अधिकाऱ्याने सुतावरून स्वर्ग गाठण्याचे ठरवले तर त्यात तो यशस्वी होतो.असेच प्रकरण लंडन मध्ये घडले आहे. येथे एका मर्डर प्रकरणात 30 वर्षानंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले.आणि आरोपीला शिक्षा झाली. 

 लंडनमधल्या मरीना कोप्पेल हत्या प्रकरणात तसंच काहीसं झालं. 30 वर्षांनी या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आणि मारेकरी पकडला गेला. मरीना कोप्पेलची हत्या 1994 मध्ये झाली. ती लंडनला एका फ्लॅटमध्ये एकटीच राहायची. दर वीकेंडला ती नवऱ्याला भेटायला नॉर्थम्प्टनला त्याच्या घरी जायची. एका वीकेंडला ती नवऱ्याच्या घरी गेलीच नाही. तेव्हा नवरा डेव्हिडनं तिच्या घरी लँडलाइनवर कॉल केले; पण ते उचलले गेले नाहीत. खूप वेळ झाला तरी प्रतिसाद नाही, हे पाहून त्यानं थेट लंडन गाठलं. घरातलं दृश्य पाहून तो तिथेच थबकला. मरीना ड्रॉइंग रूममध्ये मृतावस्थेत होती. मारेकऱ्याने मरीनावर 140 वेळा चाकून वार केले होते, हे शवविच्छेदनानंतर समजलं. तिच्या शरीरातून खूप रक्त गेल्यामुळे व गंभीर जखमा झाल्यामुळे मरीनाचा जागीच मृत्यू झाला होता.

हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांना मरीनाच्या घरात खरेदी केल्याची प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यावर ब्रिटिश भारतीय संदीप पटेल नावाच्या व्यक्तीच्या हाताचे ठसे होते. संदीप ज्या दुकानात काम करायचा तिथूनच ती पिशवी खरेदी करण्यात आली होती. पोलिसांनी तेव्हा 21 वर्षांचा असलेल्या संदीपची चौकशी केली. त्यानंही बॅग दाखवल्याचं कबूल केलं. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानं त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. संदीपला त्याचा फायदा झाला. कदाचित त्याच वेळी संदीपची कठोरपणे चौकशी केली असती, तर प्रकरण उलगडलं असतं. नंतर हे प्रकरण मागे पडलं.

एका केसानं लावला छडा
2008 सालापर्यंत या प्रकरणाचा विसर पडला, अचानक एके दिवशी पोलिसांनी पुराव्यांची पुन्हा तपासणी केली, तेव्हा त्यांना मरीनाच्या अंगठीवर एक केस दिसला. त्या काळात डीएनए तपासणीमध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे ते प्रकरण आणखी 14 वर्षं तसंच राहिलं. अखेर 2022मध्ये संदीप पटेल याच्यावरचे आरोप सिद्ध झाले. त्यानंतरही दोन वर्ष या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला. गेल्या महिन्यात पटेल याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

या प्रकरणात नंतर जेव्हा डेव्हिडची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यानंही त्याचा गुन्हा कबूल केला होता. त्यालाही जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलीय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close