एकतर्फी प्रेमातून तरूणी ने लावला डॉक्टरच्या कार वर ट्रॅकर
दिवसातून करत होती 1 हजार पेक्षा जास्त कॉल
ब्रिटन /इंटरनॅशनल डेस्क
प्रेमात पडलेला व्यक्ती कुठल्याही मर्यादा ओलांडण्यास तयार असल्याचे पाहायला मिळते. त्यातल्या त्यात प्रेमात जर अपयश आले तर मग आणि प्रेम जर एकतर्फी असेल तर दोघांपैकी एक कुठल्या स्तरावर जाईल याची कल्पना न केलेलीच बरी.असेच एक प्रकरण नैर्ऋत्य ब्रिटनमधल्या डेव्होन राज्यातल्या एक्सेटर शहरात घडले आहे. ब्रेकअप झाल्यानंतर या तरुणीने डॉक्टर ला ईतका त्रास दिला की त्याला मानसिक ताण आला .= शेवटी त्याला पोलिसांत धाव घ्यावी लागली.
पीडित डॉक्टर 54 वर्षांचा असून त्याची कथित प्रेयसी नर्स 30 वर्षांची आहे. ब्रेकअप झाल्यानंतर या नर्सने डॉक्टरचा पाठलाग सुरू केला होता. त्यासाठी तिने त्याच्या कारमध्ये ट्रॅकर बसवला होता. एवढंच नाही, तर ती दररोज त्याला हजारपेक्षा जास्त कॉल्स करत होती.
डेव्हिड पॅग्लिएरो असं पीडित डॉक्टरचं नाव आहे. तो दोन मुलांचा पिता आहे. त्याला त्रास देणाऱ्या नर्सचं नाव सोफी कॉलव्हिल असं आहे. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचा 2021मध्ये मृत्यू झालेला आहे. त्यानंतर तो आपल्या नर्सशी (सोफी) रिलेशनशिपमध्ये आला; पण सोफी त्याच्यावर संशय घेऊ लागली. ती लपून छपून त्याचा पाठलाग करत होती. ही बाब त्याला समजल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. तरीदेखील सोफी त्याचा पाठलाग करत होती. तिने त्याच्या कारला ट्रॅकरही लावला होता आणि दिवसातून 965 वेळा ती त्याला कॉल करत होती. एक दिवस तर तिने हजारपेक्षा जास्त कॉल केले होते.
एक दिवस सोफी आपल्या प्रियकर डॉक्टरच्या घरात जबरदस्तीने घुसली होती. बेडरूममध्ये प्रवेश करताच सोफीने त्याच्यावर जबरदस्ती केली आणि फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने खिडकीतून ओरडून लोकांकडे मदत मागितली आणि स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर सोफीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली होती.
सोफीला अटक झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. सोफी डेव्हिडच्या घरात शिरल्याचं रेकॉर्डिंगही कोर्टात सादर करण्यात आलं आहे. कोर्टाने तिला 20 आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तिचं नर्सिंग लायसेन्स पाच वर्षांसाठी रद्द करण्यात आलं आहे. बचाव पक्षाचे वकील पीटर सेग्ने यांनी कोर्टात सांगितलं होतं, की ब्रेकअपनंतर सोफीची स्थिती फारच चिंताजनक झाली होती. त्यामुळे ती अशी वागली. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार या सर्व प्रकारामुळे त्याला मानसिक तणाव आला आहे.