क्राइम

एकतर्फी प्रेमातून कॉलेज कॅम्पस मध्ये घुसून तरुणीची हत्या 

Spread the love

हुबळी  /नवप्रहार मीडिया 

            हुबळी (कर्नाटक ) येथून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमातून एका धर्मांध तरुणाने तरुणीवर चाकूने सपासप वार केले . मुख्य म्हणजे कॉलेज कॅम्पस मध्ये घुसून तरुणाने हे कृत्य केले आहे. घटना केएलई टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी च्या आवारात घडली आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सनकी प्रियकर युवतीवर चाकूने वार करताना दिसतो.

फय्याज असं या आरोपीचं नाव असून हल्ल्यात जखमी युवतीला तातडीनं कॉलेजजवळील रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु रस्त्यातच तिने अखेरचा श्वास घेतला. आरोपी युवक हा त्या कॉलेजमध्ये शिकत नसतानाही त्याने कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून मुलीवर जीवघेणा हल्ला केला. प्रत्यक्षदर्शीनुसार, युवतीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर आरोपी फय्याज पळून जाण्याचा प्रयत्नात असताना तिथल्या काही युवकांनी आणि कॉलेज कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हाती दिले.

मृत युवतीचं नाव नेहा हिरमेठ असून ती काँग्रेस नगरसेवकाची मुलगी होती. तर आरोपी युवक फय्याज कोंडीकोप्पा बेळगाव जिल्ह्यातील सवादट्टी इथं राहणारा होता. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा गेल्या २ महिन्यापासून कॉलेजला जाऊ शकली नाही. कारण ती आजारी होती. गुरुवारी परीक्षा देण्यासाठी ती कॉलेजला पोहचली होती. परंतु त्याचदिवशी तिच्यावर हल्ला करण्यात आला. नेहा परीक्षा देऊन वर्गाबाहेर पडली तेव्हा तिथेच उभ्या असणाऱ्या फय्याजनं तिच्यावर चाकूहल्ला केला. तिच्या पाठीवर, मानेवर चाकूचे वार झाल्यानं रक्ताच्या थारोळ्यात ती खाली कोसळली.

युवक आणि युवती हे दोघे एकत्र यूजी कोर्स करत होते. तिथेच दोघांची मैत्री झाली. परंतु फय्याजनं मैत्रीलाच प्रेम समजलं. त्याने नेहा प्रपोज केला. त्यावर नेहाने नकार दिला. तेव्हापासून नेहा त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. नेहानं तिच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला, तेव्हा तिच्या घरच्यांनी फय्याजला नेहापासून दूर राहा असं खडसावलं. त्याघटनेपासून आई वडील मुलीला कॉलेजमध्ये नेण्यापासून आणण्यापर्यंत सोबत असायचे. मात्र गुरुवारी या घटनेनं कॉलेजच्या सुरक्षेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close