क्राइम

बाई $$$$$$ तुम्हीही  महिला तलाठी लाच घेताना पकडल्या गेली

Spread the love

नवप्रहार वृत्तसेवा / अहमदनगर

                        राज्यात  लाच स्वीकारणाऱ्यांवर सगळीकडे कारवाई होत असताना देखील लाच स्वीकारण्याचे प्रमाण काजी कमी होतांना दिसत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे लाच स्वीकारण्यात पुरुषच नाही तर महिला देखील मागे नसल्याचे अनेक प्रकरणा वरून समोर आले आहे. नुकतेच एका महिला तलाठी आणि तिच्या मदतनीस 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ) छत्रपती संभाजीनगर रोडवरील भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे करण्यात आली.

तलाठी निकिता जितेंद्र शिरसाठ  (वय-46), खासगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे (वय-26 रा. निर्मल नगर, तपोवन रोड, अहमदनगर) असेल लाच स्वीकारताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत नगर तालुक्यातील शेंडी येथील 35 वर्षीय व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे  तक्रार केली आहे.

तक्रारदार यांची मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी तलाठी निकीता शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB) तक्रार केली.

प्राप्त झालेल्या तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी निकिता शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांचेकडे जमिनीच्या खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागणी करून ती लाच रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितले.

त्यानुसार एसबीच्या पथकाने सोमवारी छत्रपती संभाजी नगर रोड वरील भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे सापळा लावला.
आरोपी संकेत ससाणे याने तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष 50 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन  येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर  अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट , पोलीस निरीक्षक शरद गोर्डे
पोलीस अंमलदार राधा खेमनर, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक हारून शेख, दशरथ लाड
यांच्या पथकाने केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close