सर्विसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसर फुठल्या ने अपघातात एक जण गंभीर जखमी

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी ।
पुसद
शहरातील शनी मंदिराजवळील राहुल सर्विसिंग सेंटर मध्ये कॉम्प्रेसर फुटल्याने तेथे काम करत असलेल्या तरुणाचा हात निकामी झाल्याची घटना दि.१३ऑक्टोबर २०२३ रोजी च्या वाजता सकाळी १०.३० घडली आहे.शनि मंदिराजवळ बस स्टँड च्या मागच्या बाजूच्या भिंतीला लागून असलेले राहुल सर्विसिंग सेंटर टू व्हीलर दुरुस्ती करण्याचे दुकान आहे.
अब्दुल रहीम वय ३५ रा.गढी वार्ड असे जखमीचे नाव आहे.तो नेहमीप्रमाणे सर्विसिंग सेंटर काम करण्यासाठी आला होता.त्याने कॉम्प्रेसर सुरू केले.अशातच कॉम्प्रेसर फुठल्या ने काम करत असलेल्या अब्दुल चा हात निकामी झाला आहे.त्याला जवळच असलेल्या जाधव हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.परंतु प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला औरंगाबाद येथील दवाखान्यात हलविल्याची सूचना जाधव डॉक्टरने दिल्याने औरंगाबाद कडे रवाना करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती.