रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे श्री. डॉ. आर. जी. राठोड कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजन
नव प्रहार वृतसेवा :- अनिल डाहेलकर
मुर्तिजापूर ( विशेष प्रतिनिधी ) येथिल श्री. डॉ. आर. जी. राठोड कला व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने रसायनशास्त्र विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत सुकलेल्या फुलांपासून अत्तर निर्मिती कशी करायची ? या विषयावर ही कार्यशाळा होती. कार्यशाळेच्या सुरुवातीला रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. दुपारे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा हेतू विशद करून सांगितला.
महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मंदिरातून, दर्गा व इतर धार्मिक स्थळावरून वेगवेगळ्या प्रजातीची फुले आणलेली होती. या फुलांपासून अत्तर कसे काढायचे, याची प्रात्यक्षिक डॉ. डी श. बी. दुपारे यांनी विद्यार्थ्यांना दिले व त्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकाचा स्वतः अनुभव घेतला.
या प्रात्यक्षिकामुळे यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला व फुलांपासून अत्तर काढण्याचे प्रात्यक्षिक यशस्वी केले अशा विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विभागाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यशाळेसाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दमयंतीताई राठोड , संस्थेचे सचिव डॉ. अनिलभाऊ राठोड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. चर्जन यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.