शाशकीय

कृषि विज्ञान केंद्र दुर्गापुरच्या कर्मचार्यांचे एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन.

Spread the love

ICAR च्या भेदभावपूर्ण धोरणांविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलनात सक्रिय सहभाग.

अमरावती दि. (प्रतिनिधी) : अमरावती जिल्हा नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्यांाच्या सेवेसाठी सूप्रसिद्ध असलेले व गत अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत असलेले दुर्गापुर (बडनेरा) येथील कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन केले.
भारतीय कृषी अनूसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली अंतर्गत नसलेल्या विविध कृषि विद्यापीठ व खाजगी संस्थांच्या अधिपत्याखालील केव्हीके कर्मचाऱ्यांनी “एक देश, एक केव्हीके” धोरण राबवण्याच्या मागणीसाठी आणि परोडा उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार भेदभाव संपवण्यासाठी लेखणी बंद आंदोलन व निदर्शने केली. या आंदोलनात ICAR अंतर्गत नसलेल्या ६५० पेक्षा जास्त केव्हीके मधील शास्त्रज्ञ, तांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते हे विशेष.
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के.पी.सिंह आंदोलकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, या आंदोलनामुळे केव्हीके कर्मचाऱ्यांचे दुःख समोर आले आहे आणि कृषी विस्तार क्षेत्रातील असमानतेच्या मुद्द्यांवर प्रकाश पडला आहे. ICAR कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच “सर्व केव्हीकेला एकच धोरण” लागू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली, ज्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळतील.
केंद्र व राज्य सरकारांनी यामध्ये हस्तक्षेप करून केव्हीके कर्मचाऱ्यांना “समान काम, समान वेतन”, “One KVK, One Policy”, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ तसेच डॉ. परोडा समितीने केलेल्या शिफारशी त्वरित लागू करून न्याय्य मागण्यांचे समाधान करावे व भेदभाव बंद करावा. अन्यथा, देशभरातील संपूर्ण के.व्ही.के.चे कर्मचारी लवकरच आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा National Forum of KVK तर्फे संतोष देशमुख यांनी दिला.
यामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के.पी.सिंह, विषय विशेषज्ञ प्रताप जायले, डॉ. हर्षद ठाकुर, महेश आखूड तसेच राहुल घोगरे, आरती वर्मा, आकाश धरमकर, सुरेश वैद्य, ज्ञानेश्वर जिराफे यांचेसह सचिन पिंजरकर, अश्विनी रंगे, प्रणाली देशमुख, डॉ. विशाखा पोहरे, शाम भुरके, ऋषिकेश शिंदे, निशा राठोड, विशाखा राणोटकर, आशीष रंगारी, सिद्धार्थ गडलिंग यांचेसह अनेक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close