क्राइम

तीन कोटी रुपयांची विमा पॉलिसी आणि 45 कोटीची संपत्ती असणाऱ्या पती सोबत पत्नीने केले असे

Spread the love

कानपूर / नवप्रहार मीडिया 

            मानवाच्या मनात स्वार्थी भावना घुसली की स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी मग तो मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाही. असेच  येथील ऐका शिक्षकासोबत घडले. प्रेमात पडलेल्या त्याच्या पत्नीने प्रीयकरा सोबत मिळून त्याच्या हत्येची चार लाखात सुपारी दिली. सुपारी घेणाऱ्यांनी त्याची कार खाली चिरडून हत्या केली. पोलिसांना हा अपघात वाटत होता. तर शिक्षकाचे कुटुंबीय हा अपघात मानायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी तपास केला असता हा अपघात नसून हत्या असल्याचे उघड झाले आहे.

प्रियकरासोबत मिळून चार लाख रुपयांना पतीच्या हत्येची सुपारी दिली. यानंतर शिक्षक मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना सुपारी घेणाऱ्यांनी त्याची कारने चिरडून हत्या केली. शिक्षिकाच्या पत्नीची नजर पतीची तीन कोटी रुपयांची विमा पॉलिसी तसेच 45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गौतमचे पिंकीसोबत 2012 मध्ये लग्न झालं होतं. राजेश सरकारी शिक्षक असण्यासोबतच प्रॉपर्टीचं कामही करायचा. वडिलोपार्जित संपत्तीसोबतच त्यांच्याकडे सुमारे 45 कोटी रुपयांची संपत्ती होती. राजेशने 2021 मध्ये कानपूरच्या कोयलानगर येथे एका भूखंडावर बांधकाम सुरू केले. त्यासाठी तो जुना शिवली रोड, जगतपुरी येथील गवंडी शैलेंद्र सोनकर याच्या संपर्कात आला.

शैलेंद्रने राजेशच्या प्लॉटवर बांधकाम सुरू केलं. या संदर्भात तो राजेशच्या घरीही जाऊ लागला. हळूहळू शैलेंद्र हा राजेशची पत्नी पिंकी हिच्याशी बोलू लागला. पिंकी दिसायला सुंदर आहे. त्याला पिंकी आवडू लागली. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. आठ महिन्यांपूर्वी पिंकीचा पती राजेश याला शैलेंद्र आणि पिंकी यांच्यातील अफेअरची माहिती मिळाली. यानंतर राजेशने शैलेंद्रला त्याच्या घरी येण्यास मनाई केली. यावरून. पिंकीचा राजेशसोबत रोज वाद होऊ लागले.

पिंकीने एकदा राजेशच्या जेवणात विष मिसळल्याचं सांगितले जात आहे. यानंतर राजेशची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर राजेशच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याचा जीव वाचला. पिंकीने राजेशला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. राजेशच्या नावावर तीन कोटी रुपयांचा विमा होता. पिंकीची नजर त्याच्या तीन कोटी रुपयांची विमा पॉलिसी तसेच 45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर होती. त्यामुळे तिने प्रियकर शैलेंद्रसोबत एक प्लॅन केला.

शैलेंद्रने त्याचा चुलत भाऊ विकास आणि त्याचा सहकारी सुमित कथेरिया याला राजेशची हत्या करण्याची सुपारी दिली. राजेशला कारने चिरडून ठार मारण्याचा कट रचण्यात आला. राजेश रोज मॉर्निंग वॉकसाठी जात असत. तेव्हा राजेशला कारने चिरडले. सुरुवातीला पोलीस या घटनेला अपघात मानत होते. मॉर्निंग वॉक करताना अशा घटना घडतात, असे पोलिसांना वाटत होते. पोलीस हा अपघात मानत होते, मात्र शिक्षक राजेशचे कुटुंबीय ही हत्या असल्याचे सांगत होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close