धान फाउंडेशन च्या वतीने हॉटेल राधे मंगलम येथे एक दिवसीय शेतीविषयक शिबिर संपन्न
यवतमाळ (वार्ता)
अरविंद वानखडे
आज दिनांक 7 जून रोजी यवतमाळ येथील हॉटेल राधे मंगलम मध्ये धान फाउंडेशन च्या वतीने एक दिवसीय शेती विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी भान फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी मिस्टर यम पल्लवी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शेती विषयक व आजची शेती कशी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले शेती करत असताना शेतीमध्ये ऑरगॅनिक शेती ला कशाप्रकारे भर दिला पाहिजे व शेत तलावातील गाळ उपसून शेतीमध्ये कशाप्रकारे टाकला पाहिजे यावर त्यांनी भर दिला आधुनिक काळात शेती उपयोगी लागणारे सर्व वस्तू कसे कमी किमतीत दिल्या जाते यावर सुद्धा त्यांनी भर दिला
शेतीविषयक शास्त्रज्ञ डॉक्टर राहुल चव्हाण यांनी पाझर तलावातील गाळ उपसा करून शेतीमध्ये टाकून ऑरगॅनिक शेती कशा पद्धतीने फायदेशीर ठरते यावर भर दिला, यानंतर डी आर डी ए चे ढाकणे साहेब ग्रामीण भागाचा शेतकरी विशेष करून आपल्या महाराष्ट्र विदर्भातील का अप्रगत आहे व पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी कशा पद्धतीचा प्रगत आहे या दोन मधल्या तफावतीचे अंतर समस्त उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनातून केले संचालन श्री मिस्टर अमित एडके यांनी केले