पहिल्याच दिवशी त्याला बायको बद्दल जे कळले त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली

जळगाव / नवप्रहार मीडिया नेटवर्क
सोशल मीडियावर अनेक वैवाहिक साईट उपलब्ध झाल्याने विवाह इच्छुक लोक आता त्या साईट वर जाऊन जोडीदार निवडत लग्न ही करतात. पण लग्नानंतर काही गोष्टी उघड झाल्यावर मात्र दोन्हीं कडील मंडळींची एका पक्षाने फसगत केल्याचे समोर येते. या प्रकरणात देखील वधू पक्षाकडून वर पक्षाची फसगत करण्यात आली आहे.
असाच प्रका जळगावात समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर लग्नाची मागणी..तरूणी कडून लग्नास होकार मिळतो व थाटात लग्नही होते. परंतु, लग्नानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण जिच्यासोबत लग्न केलं ती महिला नाही, तर तृतीयपंथीय असल्याचे समोर आल्यानंतर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.तृतीयपंथी असताना मुलगी असल्याची बतावणी करून विवाह करणाऱ्या तृतीयपंथीविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी (ता. ५) दिले. हा धक्कादायक प्रकार न्यायालयीन निवाड्याने समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर थेट विवाहाचा निर्णय अंगाशी कसा येऊ शकतो, याबाबत विचार करायला लावणारा हा प्रकार आहे.
जळगाव शहरातील कांचननगर चौगुले प्लॉटमधील मूळ रहिवासी शुभम संजय पाटकर (वय २६) खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १४ मार्च २०२३ ला शुभम मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील नावाने मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. ती त्याने स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये विचारांचे आदानप्रदान होऊन अवघ्या १५ दिवसांत दोघांनी लग्नाचा बार उडवून दिला. नवरा मुलगा शुभम पाटकर याच्या वाढदिवसाचा मुहूर्त पाहून परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला.
लग्नानंतर नवदांपत्याचे देवदर्शन झाले. सर्व विवाह संस्कार पांरपरिक पद्धतीने झाले. पाटकर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला असतानाच अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पाटकर कुटुंब आणि नातेवाइकांनी नवदांपत्याच्या मधुचंद्राची तयारी केली, खोली सजविली. जोडपे आत गेल्यावर पत्नी म्हणून शुभमने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, दिव्याने मला त्रास होतोय, असे सांगून शिव्या देत त्याला खोलीबाहेर काढले. लग्न करून आणलेली व्यक्ती मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबीयांना धक्का बसला व त्यांनी मदतीसाठी पोलिस ठाणे व न्यायालयात धाव घेतली. पीडित कुटुंबीयांकडून ॲड. केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली…अन् पायाखालची जमीन सरकली
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
घडल्या प्रकाराबाबत शुभम पाटकर व कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांसह रामानंदनगर पोलिसांत लेखी फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, सोशल मीडियावरील संशयिताच्या गैरवर्तनाचे दस्तऐवज अशांसह न्यायालयात दाद मागितली. प्रथम वर्ग न्यायाधीश आर. वाय. खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.