हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त,नेहरू महाविद्यालयात भव्य रोगनिदान, शस्त्रक्रिया व उपचार शिबिर, रुग्णांना औषधीचे वाटप,आरोग्य दूत म्हणून तिन्ही तालुक्यात आमदार संजय राठोड यांचे नावलौकिक.
नेर:- नवनाथ दरोई
माॅ आरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित आर्चाय विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने, नेर येथील नेहरू महाविदयालयाच्या प्रांगणात सकाळी दहा ते दोन या दरम्यान उपचार व सुविधासह आरोग्य संकल्प अभिमान निशुल्क रोग निदान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व नेर,दारव्हा, दिग्रस मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या शिबिरात कर्करोग, हृदयरोग,नेत्ररोग, स्त्रीरोग,अस्तीरोग, त्वचारोग, नाक कान घसा, दत्त व मुखरोग, सर्जरी, युरो तज्ञसह विविध आजाराच्या उपचारावरील तज्ञ डॉक्टर रुग्णाची तपासणी करतील. तपासणीनंतर रुग्णांच्या योग्य अशा बिमारीवर औषधी दिल्या जातील. ज्या रुग्णांची बिमारी येथे बसण्यासारखे नाही, त्यांना आचार्य विनोबा भावे सावंगी मेथी येथे पाठवण्यात येईल. या रुग्णांना भरतीपूर्वी बीपी, रक्त, लघवी, इसीजी, एम. आय. आर., सिटीस्कॅन, सोनोग्राफी व एक्सरे अशा महागड्या तपासण्या मुक्त करण्यात येईल,सेवाग्रामला जाण्याऱ्या रुग्णाची नेर येथील शिवसेना कार्यालयातून रवांगी करण्यात येईल. या रुग्णाच्या सोबत नातेवाईकांची भोजनाची,राहण्याची व्यवस्था आयोजन समितीकडून करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिराच्या यशस्वी करिता शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत मासाळ,मयूर काळे, राहुल तायडे, रितेश चिरडे, मिलिंद चिरडे, रुपेश गुल्हाने, वैशाली मासाळ, अर्चना ईसाळकर,वनिता मिसळे, सारिका महल्ले, अल्का नघाटे, सारिका दातीर, पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.