आध्यात्मिक
दत्त जयंती निमित्त यवतमाळ नगरीत निघाली पालखी
अरविंद वानखडे
यवतमाळ( वार्ता )
श्री गुरुदेव दत्त यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या श्री दत्त मंदिरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली असून, श्रीदत्त यांची पालखी शहराच्या अनेक भागांमधून श्री दत्तांचा जयघोष करीत अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालखीचा समारोह झाला.
त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंदिर बाजोरिया नगर परिसर येथून सुद्धा दुपारच्या सुमारास महाराजांची पालखी काढण्यात आली असून या पालखी सोहळ्यात सुद्धा अनेक भाविकांनी गर्दी केली होती तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे दर्शन सुद्धा अनेक भाविक भक्तांनी घेतले. यानिमित्त संपूर्ण यवतमाळ नगरी श्री दत्त व स्वामी समर्थ, महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1