भारतीय जनता पार्टीच्या वतीने कर्तबगार महिलांना सुषमा स्वराज अवाडं देऊन सन्मानित

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई
नेर येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाने नेर तालुक्यातील कर्तबगार महिला निवडल्या यामधे डॉ. निवेदिता चव्हाण, डॉ संतोषी राठी,अर्चना छाजेड,अरुणा जाधव, अनुराधा निकम, नम्रता चिमणे,जोती चोपडे यांना सुषमा स्वराज अवाडं, पुष्पगुच्छ व शिल्ड देउन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंच्यावर
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माया शेरे, जिल्हा समन्वयक सुभद्रा नायक, यवतमाळ जिल्हा महामंत्री वैशाली खोड, यवतमाळ महिला आघाडी शहराध्यक्ष उषा खैरे व अन्य पाहुणे मंचावर विराजमान होते. पाहुण्यांचे स्वागत मीना खांदेल,मनीषा पांगारकर, कांचन जावरकर,विणा खोडवे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी जिल्हा अध्यक्षाच्या हस्ते सपना सदावर्ते, अरुणा जाधव,अणूराधा निकम,रोहिणी माणकर,करुणा लोणारे,कोमल खांडेकर,लता भावसार,रोशनी डोंगरवार,संगीता ठव्वकर,रेखा कुथे,नम्रता चिमने,रेखा निकोरे व अन्य भाजपाच्या कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी करीता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी अथक परिश्रम घेतले.