तेली समाज महासंघ घाटंजीच्या वतीने संतश्रेष्ठ श्री. संताजी महाराज जयंती उत्साहात साजरी व कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी -आज दिनांक 10 डिसेंबर 2023 रोज रविवारला श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा आणि त्या प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम कृषी भवन घाटंजी येथे घेण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीशभाऊ मलकापूरे आणि उपस्थित मान्यवरांनी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली- कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेंद्र गोबाडे सर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुमारी कु. श्रुतिका धनंजय गुल्हाणे कु. भाग्यश्री प्रदीप डेहनकर प्रणय मनोज पारधी समीर गजानन काळे या वर्ग 10 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कु. लक्ष्मी प्रकाश गुल्हाणे तेजस सुनील बुटले अजिंक्य विनायकराव गुल्हाने संकेत रमेशराव देशमुख या 12 वीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्व. सौ.कोकीळाबाई दिगंबरराव राजगुरे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री दिगंबररावजी राजगुरे यांचे कडून रोख बक्षिस तसेच प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गुणगौरव करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये श्री.विनायकराव गुल्हाने आणि प्रशांतराव खाडे,यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सर्वश्री शंकरराव लाकडे सर श्री देवीदासजी टोंगे सर श्री दिगंबररावजी राजगुरे रमेशराव देशमुख साहेब सौ. वर्षाताई बुटले सौ. शुभांगीताई जीरापुरे श्री विजयराव डेहनकर सौ. सरिताताई गोल्हर, प्रशांतभाऊ नित, आणि सतीशभाऊ मलकापूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
-कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजयराव बोंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन श्री विठ्ठलराव पारखे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आशिषभाऊ साखरकर,शंकरराव साठवणे, दिपकराव नीत, विलासभाऊ कठाणे,गोलूभाऊ फुसे, धनंजय गुल्हाने, वासुदेवराव गोबाडे सर, नरेशभाऊ लांजेवार, चक्रधर कापसे सर, सुनिल बुटले, प्रविण पिंपळकर,आशिषभाऊ सावरकर,किशोरभाऊ वाडे सन्माननीय समाज बांधवांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाकरिता श्री. संताजी महिला मंडळ, बहुसंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.