कुणबी समाज विकास मंडळाचे वतीने खा.अनुप धोत्रे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
पातूर तालुका प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे कुणबी समाज विकास मंडळ,अकोला जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2024 व नवनिर्वाचित मा.खासदार
श्री अनुपदादा संजय धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक मंडळाचे स्व.किसनराव सोनोने मंगल कार्यालय, पॉवर हाऊस समोर गोरक्षण रोड अकोला येथे आज रविवारी करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री रणधीरभाऊ सावरकर आमदार अकोला पूर्व,तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रकाशभाऊ भारसाकळे,आमदार अकोट व मान्यवर अतिथी म्हणून सौ.सुलभाताई दुतोंडे जि. प. सदस्या,अकोला, सौ. कल्पनाताई वा. घावट,बांधकाम सभापती न. प.अकोट, मा. सौ देवश्री ताई कि.ठाकरे अ.जि महिला आघाडी शिवसेना (उ बा ठा),श्री कैलाशदादा गोंडचर,अध्यक्ष अकोट ता. राकाँपा (शरदचंद्र पवार) व मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशराव बोर्डे,कार्याध्यक्ष गजानन खारोडे, सचिव गजानन इंगळे व कार्यकारिणीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासंबधी व शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन प्रा.राम कुटे संचालक शुअर- विन कोचिंग क्लासेस यांनी केले या वेळी खासदार अनुपदादा धोत्रे यांनी कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन मंडळाची या वेळी स्तुती केली,अकोला पूर्व चे लोकप्रिय आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांनी या वेळी मंडळाला सूचना दिली की समाज बांधवाचा डाटा गोळा करून शासनाचा विविध योजनांचा लाभ समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे,तसेच त्यांनी विकास निधी अंतर्गत समाज मंडळाच्या विकास कामाकरीता 25 लाखाचा निधी जाहीर केला तर आमदार श्री प्रकाशभाऊ भारसाकले यांनी मंडळाद्वारे राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेऊन कुणबी समाज मंडळ मुंडगाव यांना रुपये 25 लाख विकासनिधी यावेळी मंजूर केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन इंगळे व कू.रेणू संजय शेळके यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद मोरखडे,राजेश गावंडे, डॉ.पाटेकर ,राजू वहिले,किशोर कावरेसर, पागृत कोचिंग क्लासेस चे प्रशांत पागृत सर यांनी परिश्रम घेतले
आणि आभार प्रदर्शन संजय शेळके व गजानन वारकरी यांनी केले यावेळी मंडळाचे विजय हरणे भास्कर पुराळे बबन उबाळे विठ्ठल उबाळे कल्याणी ताई सोनोने, वासुदेवरावजी निंबोकर, शिवा गोंड, जनार्दन भगत, ज्ञानेश्वर भगत, अनंत गावंडे, राजू चिखले, राजू शेंडे, डॉ किसन वैद्य, राम कवळे, रमेश दुतोंडे, संदीप इंगळे, ज्ञानेश्वर हागे, रामधन शेळके, अनिल पटवी, मनोज कोरडे, पवन माळी, मुरलीधर माळी डॉ.गोंड, गणेश भाजीपाले, दिलीप ठाकरे, गोपाळ गणेशपुरे अहिर गुरुजी, बाळासाहेब घावट, रविभाऊ वाकोडे,दिलीप मोरखडे,विलास मोरखडे,सुनील निंबोकार,प्रधान साहेब,किशोरभाऊ ठाकरे,संतोषभाऊ मोरखडे,प्रशांत उबाळे,गजानन कासोद,अरूनराव वानखडे,प्रमोद पागृत सर,चौधरी साहेब,देवानंद गहीले,मुरलीधर राऊत,सौ.इंगळे सौ खरोडे सौ.पाटेकर सौ.शेळके सौ मोरखडे इत्यादी व बहु संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी महिला व पुरुष उपस्थित होते या वेळी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख व पातूर पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले यांचा आणि मुरलीधर राऊत व दिलीप ठाकरे यांचा समाज भूषण म्हणून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी कुणबी समाज विकास मंडळाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते महिला भगिनी कुणबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते