ओली पोपचे शतक ; वर्ल्ड रेकॉर्ड ला गवसणी
ओव्हल / क्रीडा प्रतिनिधी
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात इंग्लंड मध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना केनिग्टन ओव्हल याठिकाणी खेळला जात आहे. या सामन्याच्या पाहिल्यास दिवशी इंग्लंड चां कर्णधार ओली पोप याने शतक झळकावले आहे. या शतकासह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ला गवसणी घातली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर ल जे जमले नाही ते पोप याने करून दाखवले आहे. या मालिकेत इंग्लंड ने आधीच २-० अशी आघाडी घेतली आहे
ओली पोप याने डावातील 44 व्या ओव्हरमध्ये असिथा फर्नांडो याने टाकलेल्या 5 व्या बॉलवर चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. ओलीने 102 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकार ठोकले. तसेच ओलीने या शतकी खेळीत 20 एकेरी, 5 दुहेरी आणि 3 तिहेरी धावा घेतल्या. तर ओलीने 59 बॉल डॉट केले. ओलीच्या कसोटी कारकीर्दीतील हे 7 वं शतक ठरलं. ओलीने या सातव्या शतकासह इतिहास रचला. ओलीने या शतकासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
ओलीचं ऐतिहासिक शतक
ओलीने कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कारकीर्दीतील पहिली सातही शतकं वेगवेगळ्या संघांविरुद्ध झळकावण्याचा कारनामा केला आहे. ओलीआधी अशी कामगिरी कुणालाच जमली नाही. इतकंच काय, तर सचिन तेंडुलकरलाही असा कारनामा करता आला नाही. तसेच ओलीचं हे कर्णधार म्हणून पहिलंवहिलं शतक ठरलं. ओली बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
7 शतकं 7 देश
ओली पोप याने कसोटी कारकीर्दीतील त्याचं पहिलंवहिलं शतक हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2020 साली झळकावलं होतं. ओलीने त्यानंतर न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, भारत, वेस्टइंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध शतक केलंय.
ओलीचं शतक, धावा आणि वर्ष
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 135 नाबाद, 2020
- विरुद्ध न्यूझीलंड, 145, 2022
- विरुद्ध पाकिस्तान, 108, 2022
- विरुद्ध आयर्लंड, 205, 2023
- विरुद्ध भारत 196, 2024
- विरुद्ध विंडिज, 121, 2024
- विरुद्ध श्रीलंका, नाबाद 103, 2024