हटके

अरे बापरे बाप …. ! ते विमानातच बनवत होते लैंगिक संबंध 

Spread the love

ब्रिटन / नवप्रहार मीडिया 

         लोकं कधी काय करतील याचा नेम नसतो. बरं काही गोष्टी एकांतात आणि खाजगी ठिकाणी  करायच्या असतात पण लोकांना त्याचे देखील भान नसते. विदेशात सेक्स वर काही बंधन नसले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. पण एका जोडप्याने विमानाच्या वॉशरुम मध्येच सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार याच विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाश्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. यानाबतर त्या दोघांना विमानातून उतरवण्यात आले. ब्रिटनच्या ल्युटनहून इबीझाला जाणाऱ्या इझीजेटच्या  विमानात हा प्रकार घडला आहे.

  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित जोडपं विमानाच्या वॉशरुममध्ये लैंगिक संबंध ठेवत होतं. यावेळी विमानातील एका कर्मचाऱ्याने वॉशरुमचा दरवाजा उघडला. यानंतर संबंधित सर्व प्रकार उघडकीस आला. ८ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेची ३७ सेकंदाची एक व्हिडीओ क्लिप ‘एक्स’वर (ट्विटर) व्हायरल झाली आहे.

विमानातील वॉशरुममध्ये सुरू असलेला प्रकार लक्षात आल्यानंतर, एका कर्मचाऱ्याने वॉशरुमचा दरवाजा उघडला. यावेळी संबंधित जोडपं अवघडलेल्या स्थितीत आढळून आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर विमानातील इतर प्रवाशांना हसू आवरता आलं नाही. तर काही जणांनी आरडाओरड केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर EasyJet च्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली. ८ सप्टेंबर विमानात घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित जोडप्याला विमानातून उतरवल्याची माहिती प्रवक्त्याने दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close