क्राइम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात झोकणाऱ्या   महिलेला अटक

Spread the love

बदलापूर / नवप्रहार मीडिया 

                     अल्पवयीन मुलींना आमिष दाखवत त्यांच्या कडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेच्या मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.

बदलापुरात एक महिला अल्पवयीन मुलींचा वापर करून वेश्याव्यवसाय करून घेतले जात होते. या प्रकरणाची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास मिळाली होती. त्यानुसार बदलापुरात नवरत्न हॉटेल समोर सापळा रचून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

तर तिच्या तावडीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.बदलापुरात एक महिला अल्पवयीन मुलींना वैश्यव्यवसायाच्या मार्गावर आणत असल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बदलापुरात सापळा रचला होता. दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एक महिला संशयित्रीच्या नवरत्न हॉटेल जवळ उभी असल्याचे निदर्शनास येतात पथकाने या महिलेची चौकशी केली असता तिच्याकडे दोन अल्पवयीन मुली सापडल्या.

त्या दोन मुलींपैकी एक मुलगी पीडित असल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलींकडून वैश्य व्यवसाय करून घेणाऱ्या संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close