Uncategorized

अंजनगाव सुर्जी नगर परिषद येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनेचा आक्रोश मो

Spread the love

 

 

अवाढव्य मालमत्ता कर आकारणी कमी करण्याकरीता मुख्याधिकारी यांना दिले निवेदन 

 

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे 

 

अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या माध्यमातून गेली वर्षभरापासून शहरातील सर्व मालमत्तांचे स्थळ निरीक्षण केले.अंजनगाव सुर्जी शहरामध्ये नागरिकांच्या घरांचे सर्वेक्षणामध्ये लावण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणी ही गरीब,कष्टकरी,शेतमजूर व सर्व शहरातील जनतेला मान्य नाही. अशा प्रकारची चुकीची कर आकारणी केलेली आहे,अशी केलेली मालमत्ता कर वाढ हि १०% असते.परंतु अंजनगाव सुर्जी नगर परिषदेने सन २३-२४ मध्ये अव्हाच्या सव्हा कर आकारणी केली आहे.अंजनगाव सुर्जी शहरावर जबरदस्तीने चौपट ते सहापट मालमत्ता कर वाढ केली आहे.तसेच नगरपरिषद मार्फत पुरविण्यात येत असलेल्या सुविधा ज्याचा कर नागरीक भरत आहेत त्या तुलनेत सोयी-सुविधा सवलती ह्या अपुऱ्या आहेत.तरी सुद्धा शहरातील नागरीक आकारून दिलेला मालमत्ता कर नियमित भरतो.परंतु; सदर वाढविलेला करवाढ ही नागरिकांना मान्य नसून त्याबाबत शहरात सर्वत्र नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे.

तसेच न.प.कार्यालय ने नेमून दिलेल्या कंत्राटदाराने सर्वेक्षण करतांना एकाच घराचे दोन भाग दाखवून त्या घरांचे वेग-वेगळे फोटो, दाखवून व वेग-वेगळी कर आकारणी करून ग्राहकांना नोटीस देण्यात आल्या.या प्रकारच्या फार मोठ्या चुका यामध्ये दिसून आल्या आहेत.वाढीव घर टॅक्स निर्णय ताबडतोड रद्द करून कर आकारणी त्वरित रद्द करावी व तश्या प्रकारची सूचना काढून जनतेपर्यंत निर्गमित करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

  निवेदन देतेवेळी 

मानवाधिकार सहायता संघाचे तालुका अध्यक्ष महेन्द्र भगत, सुनिल माकोडे,पंकज हिरुळकर, सचिन इंगले,घरकुल संघर्ष समितीचे सचिन गावंडे, शंकर मालठाणे, सचिन जायदे,

भाजपा चे माजी आमदार रमेश बुंदीले, माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे,विलास कविटकर,ऍड पद्माकर सांगोले, संजय नाठे मनोहर मुरकुटे,गणेश पिंगे,उमेश भोंडे, अजय पसारी, मनीष मेन, विक्रम पाठक, सौं लेंढे, सौं प्रियांका मा लठा णे, सौं शिला सगणे, मनोहर भावे, हर्षल पायाघणं, सतीश वानखडे, अविनाश पवार,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदिप येवले,अफसर बेग व पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी सहीत शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***********************

“चौकट”

 

नगरपरिषद अंजनगाव सुर्जी सन 23-24 व 26-27 च्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम कलम 1965 चे कलम 1917 अन्वे प्रारूप कर आकारणी ही आमच्या न प च्या दि २५/११/२०२२ च्या ठरवानुसार प्रसिद्ध केली असुन या प्रारूप कर नुसार कर आकारणी केली असुन त्या मध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता कर आकारनी करण्यात आली त्या अनुषंगाने नागरिकांचे निवेदने, आक्षेप आले आहेत किंवा ज्या नागरीकांना चुकीचे कर आकारले आहे असे वाटत असेल किंवा त्यांना कर जास्त आकारण्यात आला त्या सर्वांनी नगर परिषद ने दिलेल्या विहित मुदती पर्यन्त आपला आक्षेप नोंदवावा आलेल्या आक्षेप नुसार सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या माध्यमातून सुनावणी करून योग्य ती कारवाई करणार आहे. तर नागरिकांनी विहित मुदती पर्यन्त आपला आक्षेप अर्ज नोंदवावा.असे 

प्रशांत उरकुडे मुख्याधिकारी नगर परिषद अंजनगाव सुर्जी यांनी सांगितले 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close