Uncategorized

धरणात बोट ऊलटल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू

Spread the love

वर्धा / नवप्रहार मीडिया

            जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोरधरण येथे बोट उलटल्याने झालेल्या अपघातात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. केज ची तपासणी करण्यासाठी नागपूर वरून पाच अधिकाऱ्याचे पथक बोरधरण येथे आले असताना हा अपघात घडला आहे. पाहणी करून प्लॅटफॉर्म कडे येताना बोट पलटी झाल्याने पाचही अधिकारी पाण्यात पडले. त्यातील चार बचावले. युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाले. त्यांचा मृतदेह अद्याप सापडला नसून शोध मोहीम सुरू आहे.

 ही घटना शनिवार 18 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. नागपूरच्या शोध पधकाकडून शोध घेणे सुरू आहे. रविवार 19 रोजी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविली. मात्र, दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

नागपूर मत्स्य विभागाची चमू केजची तपासणीसाठी Bordharan बोरधरण येथे आले होते. तपासणी करून परत काठावर येण्यासाठी रात्री 9 वाजताच्या सुमारास बोटने प्लॅटफॉर्मवर येत असताना ती बोट पलटी झाली. यावेळी पथकातील सुनील ठाकरे, कठाणे, गेडे व महेंद्रसिंग हे प्लेटफार्मच्या दोराच्या सहाय्याने धरणाच्या पाण्यातून वर आल्याने बचावले. परंतु, युवराज फिरके हे खोल पाण्यात गेल्याने पाण्याबाहेर येऊ शकले नाही. त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आंधारामुहे शोध लागू शकला नाही. सदर घटनेची माहिती बोरी कोकाटे येथील पोलिस पाटील यांनी सेलू पोलिसांना दिली. रविवारी सकाळपासून नागपूर येथील दिलीप यादव यांच्या चमूने आपले जाळे पसरवीत बेपत्ता असलेल्या मत्स्य विभागाचे अधिकारी फिरके यांचा पाण्यात कसोशीने शोध घेणे सुरू केला आहे. मात्र, वृत्त लिहिस्तोवर त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close