क्राइम
मैत्रिणीनेच बनवले मैत्रिणीचे आंघोळ करतांनाचे अश्लील व्हिडीओ
यवतमाळ / विशेष प्रतिनिधी
म्हणतात न की महिलाच महिलेची सगक्यात मोठी शत्रू आहे. त्याची प्रचिती अहहरात एका शासकीय महाविद्यालयात आली. येथे मैत्रिणीने मैत्रिणीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिने हा व्हिडीओ व्हायरल केला अथवा काय ? हे अद्याप समजले नसले तरी या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
शहरातील एका शासकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील मैत्रीणींचा अंघोळ करीत असतानाचे व्हिडिओ बनविला. ही घटना मंगळवारी (ता.२७) उघडकीस येताच खळबळ उडाली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने १२ जणांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमली.
मैत्रिणीआपला अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ बनविल्याची बाब विद्यार्थिनींच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही बाब प्राध्यापकांना सांगितली. त्यांनी विद्यार्थिनीचा मोबाईल व लॅपटॉप ताब्यात घेत वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान पालकांसह विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रखांकडे तक्रार केली. प्रमुखांनी तत्काळ १२ जणांचा समावेश असलेली एक चौकशी समिती नेमली. पालकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
Marathis या समितीने व्हिडिओ व फोटोची पडताळणी केली. महाविद्यालयाची बदनामी होईल, या भीतीने वरिष्ठांनी चुप्पी साधण्यात धन्यता मानली. भयभीत झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुखांच्या कक्षाबाहेरच थांबले होते. या संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली त्यांनी प्रकरण गंभीर असल्याने १२ जणांची चौकशी समिती नेमण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.मैत्रिणीनेच आपला अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ बनविल्याची बाब विद्यार्थिनींच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही बाब प्राध्यापकांना सांगितली. त्यांनी विद्यार्थिनीचा मोबाईल व लॅपटॉप ताब्यात घेत वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान पालकांसह विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रमुखांकडे तक्रार केली. प्रमुखांनी तत्काळ १२ जणांचा समावेश असलेली एक चौकशी समिती नेमली. पालकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
दिवसभर या समितीने व्हिडिओ व फोटोची पडताळणी केली. महाविद्यालयाची बदनामी होईल, या भीतीने वरिष्ठांनी चुप्पी साधण्यात धन्यता मानली. भयभीत झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुखांच्या कक्षाबाहेरच थांबले होते. या संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली त्यांनी प्रकरण गंभीर असल्याने १२ जणांची चौकशी समिती नेमण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.