शिक्षक – शिक्षिकेचे शाळेतच अश्लील कृत्य
जयपूर (राजस्थान) / विशेष प्रतिनिधी
ज्या ठिकानी पालक आपल्या पाल्याला चांगले संस्कार मिळावे यासाठी पोटाला गाठ बांधून पाठवतात त्याच विद्यामंदिरात ज्यांच्यावर मुलांना घडविण्याची जबाबदारी असते तेच अश्लील वागत असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
शिक्षक आणि शिक्षिकेला शिक्षण विभागाने तडकाफडकी निलंबित केले आहे.
हायस्कुलच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये आरोपी शिक्षक आणि शिक्षिकेचे अनेक अश्लिल कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अनेकवेळा ते दुसऱ्या महिला शिक्षिकेच्या आगमनामुळे थांबतात. मात्र, दुसरी शिक्षिका गेल्यानंतर पुन्हा तेच गैरकृत्य करू लागतात. शिक्षण विभागाने जारी केलेल्या निलंबनाच्या पत्रात या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा मिळाला नसला तरी शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत घटनेचा तपास सुरू केला आहे.
शिक्षक-शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. शनिवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले व पोलीस ठाण्याचे प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. या घटनांमुळे शैक्षणिक वातावरण आणि मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे.
सध्या शिक्षक व शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, चौकशीच्या निकालाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. शिक्षण मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी अशा प्रकरणांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.