निलज गावात उपोषण सुरू.
जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे.
मोहाडी.
तालुक्यातील निलज (खुर्द) या गावात शासकीय जागेत गट क्र.४४ वरील अतिक्रमण काढावे या साठी पत्र देवून सुद्धा अतिक्रमण काढले नाही त्यामुळे अखेर दि.२७ मार्च पासून ग्रामस्थ उपोषणा वर बसले.
मोहाडी तालुक्यातील करडी लगत असलेल्या निल ज (खुर्द)हे दीड हजार लोक वस्तीचे छोटेसे गाव या गावात अनेक मुले मुली खेळाच्या मैदानात आपले कौस्यल्य दाखऊन श्यास किय नोकरीवर आहेत.
या गावातील मुलांना खेळाची जिद्द आहे हे लक्षात घेऊन २०२० साली ग्राम पंचायतीने गट क्र.४४ वर रोजगार हमी योजने अंतर्गत माती टाकून नाला काठावरची जागा सपाट केली.माती काम झाले पण त्यावर कुशल काम होण्यास आहे(मुरूम टाकने) याच गट क्र.४४ वर परमात्मा एक सेवक मंडळाच्या लोकांनी अतिक्रमण करून भवन बांधत आहेत यास गावातील लोकांचां विरोध आहे.सुरू झालेले काम ग्राम सेवक प्रशासक तलाठी यांनी बंद केले पण बंद केलेले काम वाटेल तेव्हा सुरू केले जाते त्या मुळे दोन गटात वेळोवेळी स्याबदिक वाद होतो हे अतिक्रमण काढावे या साठी अनेक वेळा तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस विभागास पत्र देवून सुद्धा अतिक्रमण काढले नाही त्या मुळे निलज येथील लोक दि.२७ मार्च पासून ग्राम पंचायत समोर उपो सनावर बसले आहेत. निलज गाव वाद ग्रस्त गाव असून या गावात अनेक रक्त रणजित चकमकी झाल्या आहेत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अतिक्रमण काढावे अशी मागणी माजी सरपंच भगवान भोयर.भगवान आगाशे संजय भोयर.तंटा मुक्त अध्यक्ष बाबुराव बोंद्रे सां.कार्यकर्ता सुभाष तितिरमारे. माधोराव राखडे प्रकाश तितिरमारे बन्सीलाल बिल्लोरे व गावकरी.यांच्या कडून होत आहे.
सदर अतिक्रमणाची जागा महसूल विभागाची नसून ग्राम पंचायती ची आहे.त्या मुळे ग्राम पंचायतीस पत्र देऊन अतिक्रमण काढण्यास सांगतो.
तहसीलदार दीपक कारंडे.
अती क्रमनची जागा महसूल विभागाची असून मी त्या साठी तहसीलदारांना पत्र दिले आहे.
ग्राम सेवक राजकुमार बोरकर.