विदेश

विमान  हवेत असताना उडाले विमानाचे छप्पर

Spread the love

          तुम्ही बस किंवा ट्रेन चे छप्पर लीक असल्याने त्यातून पाणी गळताना चे किंवा ट्रेन अथवा बस च्या खिडक्या योग्य रित्या लागत नसल्याने  प्रवाशाना त्रास झाल्याचे   किस्से ऐकले किंवा वाचले असाल. पण विमान आकाशात असताना विमानाचे छप्पर उडाल्याचे तुम्ही कधी ऐकले नसाल. पण असे घडले आहे. असा उल्लेख एका वृत्तपत्रात केला आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार , 28 एप्रिल 1988 रोजी, हवाईच्या हिलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होनोलुलूकडे उड्डाण करणारे अलाहा एअरलाइन्सच्या विमान 243 बाबत एक धक्कादायक घटना घडली. अलाहा एअरलाइन्सचे विमान 24 हजार फूट उंचीवर असताना विमानाच्या छताचा मोठा भाग हवेत उडाला. ही घटना अतिशय भयानक आणि अविश्वसनीय होती. या अपघातात विमानातील 89 जणांचा जीव धोक्यात आला होता. मात्र पायलट आणि क्रू मेंबर्सच्या धाडसी आणि तत्काळ निर्णयामुळे या अपघातात अनेकांचे प्राण वाचले.

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलटला मोठा आवाज आला आणि विमान अचानक हेलकावे घेऊ लागले. काही वेळातच विमानाच्या छताचा मोठा भाग हवेत उडाला. यामुळे अचानक केबिनमधील दाब कमी झाला आणि प्रवासी आणि क्रू मेंबर्स हवेत उडू लागले. हवेचा वेग प्रचंड असल्याने प्रवाशांनी स्वत:ला वाचवण्यासाठी विमानाच्या सीट पकडून ठेवल्या होत्या.

दरम्यान, अलाहा एअरलाइन्सच्या विमानाचे पायलट रॉबर्ट स्कॉर्न्सथाइमर कठीण परिस्थितीतही संयम राखला . त्यांनी तातडीने विमान एमर्जन्सी लँडिंगसाठी वळवले . प्रवाशांना शांत करण्यात आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यात क्रू मेंबर्सनीही विशेष भूमिका बजावली . त्यांनी प्रवाशांना ऑक्सिजन मास्क घालण्यास आणि सीट बेल्ट बांधण्यास सांगितले . विमानाचे छत उडून गेले असले तरी विमानाचा उर्वरित भाग तसाच होता . यामुळे विमान हवेत तुटण्यापासून वाचले आणि पायलटला इमर्जन्सी लँडिंग करण्याची योग्य संधी मिळाली. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचे आणि क्रू मेंबर्सचे प्राण वाचले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close