डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे आयोजन
ग्रंथवाचक सन्मान सोहळा
चांदुर रेल्वे( ता. प्र.) प्रकाश रंगारी
धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने ग्रंथ वाचक सन्मान सोहळा प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अभियानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान वेगवेगळे उपक्रम राबवून धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचा मोठ्या प्रमाणात काम करत आहे.त्यामध्ये एक आणखी भर म्हणून ग्रंथवाचक सन्मान सोहळा प्रतियोगिता राबविण्यात येणार.
ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो या दोन्हीही भागांमध्ये धम्म बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सोबतच विहारे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्या विहारांमध्ये धम्मग्रंथाचे वाचन केल्या जाते. परंतु जो वाचक असतो त्या वाचकाचा कुठेही सन्मान केल्या जात नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने या वाचकाचा कुठे तरी सन्मान व्हावा व या वाचकाला समाजामध्ये विशिष्ट प्रकारचे स्थान प्राप्त व्हावे.यासाठी हा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्याचा मानस असल्याचा अभियानाने या वेळी सांगितले.
तीन महिन्याच्या कालावधी मध्ये वर्षावासा मध्ये ग्रंथ वाचन केल्या जाते. तो वाचक तीन महिने झाल्यानंतर एका गावापासून दुसऱ्या गावाला हा वाचन करतो हे मात्र माहीत नसते. त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा हा वाचक धम्मग्रंथाचा वाचक करतो यासाठी या प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येणार आहे.अभियान प्रचारक हे खेडे पाडे,गाव,गाव जावून त्या सर्व बुध्द,आणि त्याचा धम्म वाचकाचा खूप मोठ्या संख्येत सन्मान करणार असल्याचे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या सहयोगाने करण्यात येणार आहे.
गेल्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक धम्म परिषदेचे आयोजन केल्या जाते परंतु त्यामध्ये सुद्धा या ग्रंथ वाचकाचे कुठेही सन्मान होत नाही हा वाचक समाजापुढे आला पाहिजे यासाठी हा सन्मान सोहळा आहे.या मधील वाचकांना त्यांच्या विहारा मध्ये जाऊन सत्कार करण्यात येईल असे जगदीश शिंदे, नितीन टाले, पपीता मनोहरे, ज्योती मेश्राम, मनोज गवई, अरुणा आठवले,मृदुला हेरोडे,यांच्या मार्फत होणार आहे.