हटके

त्याची कृती पाहून विमान प्रवासी अवाक, पण त्यामागे होते जुगाड

Spread the love

                  विमानाने प्रवास करताना लगेज मर्यादा ठरवून दिलेली असते. विमान प्रवासा दरम्यान  तुमच्या जवळ मर्यादेपेक्षा जास्त लगेज असले की मग तुम्हाला विविध सोपस्कर पार पाडावे लागतात. पण जुगांडू व्यक्ती याही परिस्थितीत काही न काही मार्ग काढतो. सध्या सोशल मीडियावर असाच य3क व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणाचा जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोबतच तुम्ही त्याचे कौतुक केल्याशिवाय ही राहणार नाही.

विमानात प्रवास करताना सामानाचं वजन मर्यादेपेक्षा बाहेर गेलं तर किती डोकेदुखी वाढते. देशांतर्गत प्रवासाला साधारण प्रतिव्यक्ती १५ किलो तर आंतरराष्ट्रीय प्रवासात २५ ते ३० किलो वजनाचे सामान आपण आपल्याबरोबर नेऊ शकता.

अर्थात प्रत्येक एअरलाईननुसार हा नियम बदलूही शकतो. पण थोडक्यात काय तुमच्याकडे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर मात्र त्याच्या चेक इन साठी वेगळे पैसे भरा, रांगा लावा हा खटाटोप करावा लागतो. यासगळ्यावर तोडगा म्हणून एका प्रवाशाने वेगळाच जुगाड केल्याचा व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. विमानात प्रवाशांसमोर ही व्यक्ती एक एक करून जेव्हा आपली कपडे काढू लागते तेव्हा आधी अनेकांना आश्चर्यच वाटतं पण नंतर त्यामागचं कारण समजताच सगळेच त्याच्या हुशारीची दाद देत आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक व्यक्ती साधी कॅरी बॅग घेऊन विमानात शिरतो. त्याने अंगावर साधारण अर्धा डझनभर कपड्यांचे थर लावलेले दिसतायत. स्वतःच्या सीटजवळ पोहोचताच तो हे कपड्यांचे थर एक एक करून काढू लागतो. कपड्यांच्या वजनासाठी अधिक पैसे भरण्याऐवजी त्याने हे कपडे घालून आपलं सामान वाहून आणलं होतं असं म्हणता येईल. दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तो एक एक करून हेच कपडे काढून सीटच्या वरील सामान ठेवण्याच्या जागेत ठेवत असल्याचे दिसतेय.

X वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला पोस्ट केल्यानंतर काही तासांतच लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. अनेकांनी या तरुणाला हुशार म्हटलं आहे तर काहींनी हसून या हुशारीला दाद दिली आहे. काहींनी असंही लिहिलंय की, जेव्हा ही व्यक्ती कपडे उतरवायला सुरुवात करते तेव्हा आधी हा एखादा स्टंट वगैरे असेल असं वाटतं पण नंतर त्याने अशी शक्कल लढवलीये हे लक्षात येताच ही आयडिया भारी वाटते. काहींनी तर गमतीत असंही म्हटलंय की, बिचाऱ्याने एवढं डोकं लावून आयडिया शोधली पण व्हिडीओ व्हायरल करून लोकांनी ओरडून ओरडून ही स्कीम सगळ्यांना सांगितली आहे. आता पुढच्या वेळी एअरलाईनने नवा काही नियम केला नाही म्हणजे मिळवलं.

 

दरम्यान, सुरुवातीला अनेकांना हा व्हिडीओ स्टंटबाजी वाटण्याचं कारण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी अशा विचित्र घटना समोर आल्या आहेत,  तर कधी मंदिरात मुद्दाम नग्न होऊन प्रवेश केला आहे. अशा प्रकरणांमध्ये त्या त्या वेळेस संबंधित व्यक्तींवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती पण त्यानंतरही मेट्रोपासून ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडणे काही थांबलेले नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close