सामाजिक

पत्रकारांनी आपल्या लेखनीतून समाजातील प्रश्न निष्पक्ष पणे मांडावे , चेअरमन वसंतराव कवाद सर .

Spread the love

 

पारनेर , [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] –

पत्रकारांनी आपल्या लेखनीतून समाजातील प्रश्न उजाडात आणावे , त्यामुळे ते सुटण्यास मदत होईल , असे स्पष्ट प्रतिपादन पारनेर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या निघोज मधील बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद सर यांनी केले आहे .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकारी नगर जिल्हा सचिव पदी सुरेश खोसे पाटील , तालुका मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर , उपाध्यक्षपदी ठकाराम गायखे , तालुका सहसचिव ॲड . सोमनाथ गोपाळे , निघोज शहराध्यक्ष सचिन जाधव व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे उपअभियंता म्हणून निवड झालेले तेजस बबनराव सोनवणे यांचा शाल , श्रीफळ व फुलांचा पुष्प गुच्छ देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी चेअरमन वसंतराव कवाद बोलताना पुढे म्हणाले की , निघोज सारख्या ग्रामीण भागातील पत्रकारांना राज्यातील मोठ्या पत्रकार संघाने काम करण्याची संधी दिली , ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे . या पदाधिकाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे , आपल्या लेखनीतून समाजात अनेक प्रश्न प्रलंबित व दुर्लक्ष असून त्यावर लेखन करून ते प्रकाशात आणावे , त्यामुळे ते सुटून मार्गी लागतील . पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे , त्यांचा कामाचे व निवडी चे कौतूक व्हावे , म्हणून त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला , निघोज नागरी पतसंस्था निघोज परिसरात २७ वर्षे काम करत असताना सहकारी संस्थांनी फक्त ठेवी जमा करणे व कर्ज वाटणे , फक्त एवढाच उद्देश न ठेवता , समाजाच्या विकासासाठी काय करता येईल , त्या दृष्टीने काम करणे , गरजेचे आहे . समाजासाठी काही तरी देणे लागतो , या भावनेतून काम करावे , म्हणून संस्थेचे सभासद वा त्यांच्या कुटुंबीयांनी कौतुकास्पद काम केले , तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे , हे संस्थेचे कर्तव्य आहे , त्यामुळे त्यांना काम करताना प्रोत्साहन मिळते , असे प्रतिपादन ही चेअरमन वसंतराव कवाद सर यांनी केले .
यावेळी संस्थेचे संचालक ॲड . बाळासाहेब लामखड लामखडे यांनी सत्कार मुर्तींचा परिचय करून दिला . तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी पत्रकार संघ व पत्रकारांचे कर्तव्य , कामकाज या विषयी माहिती देवून बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्था परिवाराचे ऋण‌ व्यक्त केले . तर तालुका मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर सर , सहसचिव ॲड . सोमनाथ गोपाळे , निघोज शहराध्यक्ष सचिन जाधव , नूतन उपअभियंता तेजस सोनवणे यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेच्या कारभाराचे कौतूक करून आभार मानले . यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन नामदेव थोरात , संचालक दामू थोरात , भिवाजी रसाळ , बाबाजी कळसकर , सतीश साळवे , मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय लंके , संपत ठुबे , उपव्यवस्थापक शांताराम सुरकुंडे , प्रशासकीय अधिकारी सुनिल तांबे , निघोज कृषी , फलोत्पादन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे , व्हाईस चेअरमन अमृता रसाळ , माऊली तनपुरे , बबनराव सोनवणे, पत्रकार संपतराव वैरागर , संदीपराव गाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते .
पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात आघाडी वर असलेली बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था एक आदर्श असून त्यांच्या कामकाजामुळे सर्वत्र नावलौकिक मिळविला आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close