
अंजनगावसुर्जीत अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण
*बसस्थानकाच्या प्रवेशद्वार वरच ऑटो चा गराडा
*ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या करून भरतात प्रवाशी
*अपघाताचे प्रमाणात वाढ
** पोलीस प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
***********†**************
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील नवीन बसस्थानक,जुने बसस्थानक परिसरात बेशिस्त व अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण आले असून खासगी बस ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या करून प्रवाशी भरतात तर ऑटो चालकांची मनमानी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे बस स्थानकाच्या प्रवेशद्वार वरच ऑटो उभी करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरल्या जातात यामुळे बरेचदा राज्य परिवहन मंडळाच्या बस ला स्थानकातून बाहेर निघायला व आत मध्ये जायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही परंतु वाहतूक पोलीस मात्र उघड्या डोळ्याने बघत राहतात यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे
* नवीन बसस्थानक परिसरातून अकोट, दर्यापूर व परतवाडा कडे जाण्याचे मुख्य मार्ग असून या त्रिफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते परंतु या भागात वाहतूक पोलीस वाहतुकीचे कुठलेही नियोजन करतांना दिसत नसल्याने या भागात अवैध प्रवाशी वाहने आपली मनमानी करतात त्रिफुली च्या वळणावर ट्रॅव्हल्स उभ्या राहत असल्याने इतर वाहनाला वळायला मार्ग शिल्लक नसतो परिणामी ट्रॅफिक जॅम होऊन अपघाताचे प्रसंग घडतात शिवाय ऑटोचालक आपला ऑटो बस स्थानकाच्या प्रवेश द्वार वर ऑटो उभा करून बस स्थानकातील प्रवाश्यांना ऑटोत बसवतात इतकेच नाही तर काही जन मुजोरी करून प्रवाशांचे हात धरून त्यांना ऑटोत बसवतात आणि बेशिस्त ऑटो चालवताना अनेक वेळा किरकोळ अपघात सुद्धा घडतात एकदा तर येथील वाहतूक नियंत्रक च्या दुचाकीला एका ऑटोवल्याने थेट धडक दिल्याने ते पडले व त्यांना किरकोळ दुखापत झाली त्यांनी पोलिसांना फोन केला तेव्हा कुठे पोलिसांनी काही ऑटोचालकांवर कारवाई केली परंतु या भागात निरंतर वाहतूक पोलिसांची उपलब्धता आवश्यक असून ते येथे का राहत नाहीत हा खरा प्रश्न आहे असच प्रकार येथील अग्रसेन चौकात अश्याच बेशिस्त वाहतुकीत एक चार चाकी व दुचाकीचा अपघात झाला वाहनांचे किरकोळ नुकसान झाले परंतु सुदैवाने कुठलीही जीवित हानी वा गंभीर दुखापत झाली नाही याचं वेळी जर वाहतूक पोलीस या भागात कर्तव्यावर असते तर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई झाली असती याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन येथे निरंतर वाहतूक पोलिसांचे पॉइंट लावावे जेणेकरून या बेशिस्त व अवैद्य वाहनांवर कारवाई करता येईल व बेभान वाहतुकीवर वचक बसेल अशी मागणी होत आहे
ऑटो फूटपाथ वर उभे
नवीन बस स्थानक च्या संरक्षण भिंती लगत दर्यापूर कडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेल्या फूटपाथ वर अनेक ऑटो वर्षापासून उभे केले आहेत या ऑटोच्या मालकांनी जणू ही फूट पाथ ची जागा विकतच घेतली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे बस स्थानक परिसरात हे ऑटो चालक आपल्या मताप्रमाणे ऑटो उभे करतात कधी काळी तर प्रवेशद्वार च्या मधोमध ऑटो उभा चालक इतरत्र ठिकाणी जातात तेव्हा महामंडळाच्या बसेस ला बाहेर पडण्यासाठी सदर ऑटो हटवण्याची वाट पाहत काही काळ थांबावे लागते असे प्रसंग सुद्धा घडतात हे विशेष