वंचित उमेदवाराच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची वणी येथे सभा

अरविंद वानखेडे / यवतमाळ
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या १९ एप्रिल रोजी मतदान संपन्न होत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ आज ता. ११एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टॉकीजवळ पक्ष प्रमुख ऍड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे
वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदार संघातील राजेश बेले यांचा संपूर्ण मतदार संघात प्रचाराने मुसंडी मारली असून त्यांच्या प्रचारार्थ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी खास वणी येथे सत्ता परिवर्तन सभा आयोजित केली आहे. यासभेला संपूर्ण मतदार संघातील हजारो कार्यकर्ते स्वयंमपूर्तीने उपस्थित असणार आहे. यासभेच्या निमित्याने लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे भविष्य उज्वल ठरणार आहे. तरी या सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचितचे जिल्हा अध्यक्ष डॉ निरज वाघमारे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, मंगल तेलंग, धम्मवती वासनिक, गौतम दारुंडे, कैलास धोटे, संघापाल कांबळे, प्रशिक मनवर, विलास करमनक, वैशाली गायकवाड, पुष्पा शिरसाट, शारदा मेश्राम, किशोर मुन, अर्चना नगराळे, विशाल कांबळे, अर्चना कांबळे, नंदिनी ठमके आदींनी केले आहे.