अजातशत्रू व्यक्तीमत्व – सुमित भाऊ वानखेडे

गरिबांना न्याय मिळवुन देण्यासाठी घेतात मोठा पुढाकार
बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कुतीवर भर देणारे सुमित भाऊ कोणाच्याही मदतीला धावून जाणारे ,गरजुंना सदैव मदतीचा हात देण्यात त्यांचा हातखंडा असतो. बोलके नेत्यापेक्षा काम करण्याची हातोटी सुमित भाऊ जवळ आहेत. त्यामुळे वर्धा वासियामध्ये त्यांच्या प्रति कुतूहल निर्माण झाले आहेत..
केल्याने होत आहेत रे आधीच केलेच पाहिजे, या उक्तीप्रमाणे काम करण्यात सदैव अग्रभागी असणारे सुमित भाऊ आता संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झालेले आहेत, त्यांची काम करण्याची शैली व जनतेच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करण्याची शैली वर्धा जिल्ह्यातील लोकांना फार आवडली असून, झटपट निर्णय घेण्यात त्यांचा सदैव पुढाकार असतो. शासन व प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या सुमित भाऊंचे अधिकाऱ्यांकडुन प्रेमाने काम करण्याचेही कौशल्य वादातीत आहेत. कोणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या वर्धा जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी काम कसे करता येईल, या ओतप्रोत भावनेने ते काम करीत असतात. त्यांच्या मध्ये मी पणाचा अजिबात लवलेशही नसुन सर्वांना. सोबत घेऊन चालण्याची हातोटी निर्विवाद आहेत. संघटन चातुर्य, प्रत्येक विषयाचा सखोल व दांडगा अभ्यास असल्याने वर्धा वासियामध्ये त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहेत. अशा अजातशत्रू व्यक्ती मत्वाची आपल्या भागात भेट होण्यासाठी कार्यकर्ते आसुलले आहेत. त्यामुळे जनता सदैव त्यांच्या घोडक्यात वावरत असते. अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांचे त्यांना वाढत असलेले समर्थन हे जिल्ह्यातील सर्वागीण विकासाची नांदी ठरणार आहेत.नुकतेच त्यांनी अनेक समाजातील लोकांना मदतिचा हातभार लावुन त्यांना विविध प्रकारची मदत केली आहेत. कोणत्याही गोष्टीचा गवागवा न करता, आपल्या कामावर फोकस केन्द्रित करुन जनसामान्यांना न्याय कसा मिळेल, यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न चालू असते. अशा निर्भिड मनाच्या सुमित भाऊमुळे आपल्या जिल्ह्याचा कायापालट होणार असून, भविष्यात विकासाची नांदी म्हणजे सुमित भाऊ. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. कोणत्याही विषयाची मांडणी करतांना ते सखोल व विस्तृत अभ्यास करतात.. त्यांची सर्वच भाषेवरील निर्विवाद पकड,ही त्यांच्या व्यक्ती मत्वाची छाप दर्शविते.. कोणाचेही मन न दुखवता दुसऱ्याच्या दुखात सहानुभूती पुर्वक संवेदना प्रगट करणारे सुमितभाऊ वर्धा जिल्ह्यातील लोकासाठी आशेचा कीरण ठरत आहेत… वर्धा जिल्ह्यातील सर्वकष प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील सर्वच घटकांना यथोचित व समान न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पुढाकार घेतात. पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते वाटचाल करीत आहेत. पक्षाच्या शिस्तीत वाटचाल करणारे सुमितभाऊ भविष्यात वर्धा जिल्ह्यासाठी विकासाची नांदी ठरणार आहेत.. कधीही आक्रास्तपणा न करता समजदारीने वाटचाल करणाऱ्या, सुमितभाऊलाआर्वी. व वर्धा जिल्हा वासियाकडून सुमितभाऊ यांना भाविवाटचालिसाठी मनपुर्वक शुभेच्छा…..!!!
प्रकाश निखारे ,आर्वी