क्राइम

समुपदेशनासाठी मुलीला पोलिसांकडे पाठवले अन ….

Spread the love

मुंबई /प्रतिनिधी

             17 वर्षीय मुलगी मोबाईल च्या कथित आहारी गेल्याचे कारण सांगत बापाने मुलीला त्याच्या दुष्परिनामाबद्दल माहिती व्हावी म्हणून  समुपदेशनासाठी पोलिसांकडे पाठवले. पण त्याला काय माहित होते की ही बाब आपल्या अंगलट येईल म्हणून दरम्यान कांदिवली पोलिसांना समुपदेशा दरम्यान मुलीने जे सांगितले ते ऐकून पोलीस देखील अवाक झाले.

मात्र यामुळे मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक होईल असे वाटले नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून तिचेच वडील असल्याचे समोर आलं आहे. गेल्या वर्षी वडिलांनी बलात्कार केल्याचे मुलीने सांगताच पोलिसांनाही धक्का बसला.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीच्या वडिलांनी तक्रार घेऊन आमच्याकडे आले होते. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी कथितपणे मोबाइल फोनवर बराच वेळ घालवते आणि तिला सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपचे व्यसन आहे. वडिलांनी आम्हाला पुढे सांगितले की त्यांची मुलगी तिच्या मित्रांना ॲपवर वारंवार मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवत असते.

त्यानंतर पोलिसांनी वडिलांना मुलीला तिच्या आईसोबत पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी पाठवण्यास सांगितले. तरुण वयात सोशल मीडियाच्या अतिवापराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दलच्या पोलिसांनी मुलीला माहिती देण्यास सुरुवात केली. त्यावेळी या समुपदेशनाच्या सत्रादरम्यान, मुलीने सांगितले की तिच्या वडिलांनी गेल्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता ज्यामुळे तिच्यावर खूप मोठा आघात झाला.

पोलिसांना ही माहिती कळताच जबर धक्का बसला. त्यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांविरुद्ध पोक्सो (द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी तिच्या वडिलांना अटक केली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. कांदिवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा अधिक माहिती घेण्यासाठी तपास करत आहोत.

4 वर्षाच्या मुलीवर शाळेत अत्याचार

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कांदिवलीच्या एका शाळेमध्ये अवघ्या चार वर्षाच्या मुलीवर लैंगित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शाळेतील कर्मचाऱ्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निरागस मुलाला बाथरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. पीडित मुलीच्या आईने सांगितले आहे की, कांदिवली परिसरातील प्री-स्कूलमध्ये शिकणारी 4 वर्षीय मुलगी वडिलांसोबत शाळेत गेली होती. पण 2 फेब्रुवारीला मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा तिच्या गुप्तांगामध्ये दुखू लागले. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close