हटके

प्रेयसीचा 150 फूट उंच इलेल्ट्रीक टॉवर वर चढून शोले स्टाईल ड्रमा

Spread the love

                     आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलक टॉवर वर चढल्याच्या बातम्या वाचनात येतात . शोले चित्रपटात हेमामालिनी सोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र टॉवर वर चढला होता.त्याच धर्तीवर करण्यात आलेल्या अश्या आंदोलनाला शोले स्टाईल आंदोलन असे नाव देण्यात आले आहे. पती पासून वेगळी राहणाऱ्या अनिताचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्यात काही वाद झाल्याने ती सरळ 150 फूट इलेक्ट्रिक टॉवर वर चढली. घटना छत्तीसगड राज्यातील आहे.  कहर म्हणजे तिचे मन वळविण्यासाठी प्रियकरही खांबावर चढला.

अनिता भैना ही नवापूर गावातील महिला दोन दिवसांपासून कोडगर गावात मुकेश भैना याच्या घरी राहात होती. गुरुवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि चिडून अनिता घराबाहेरील विजेच्या टॉवरवर चढली. मुकेश तिच्या मागे धावला, थांबविण्याचा प्रयत्नही केला; पण काही उपयोग झाला नाही. अखेर तोही टॉवरवर चढला. टॉवरवरच दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दोघे एकत्र खाली उतरले. तोपर्यंत पोलिस आले, दोघांना पोलिस ठाण्यात नेले आणि चौकशीनंतर अनिताला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. अनिता विवाहित असून, पतीपासून वेगळी राहते आणि मुकेशच्या प्रेमात असल्याचे सांगितले जाते. गर्दीतील कोणीतरी व्हिडीओ बनविला तो आता व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close