सामाजिक

डॉक्टर युवकाची आत्महत्या ; कारण अज्ञात

Spread the love

दुसऱ्या दिवशी बोहरल्यावर चढणाऱ्या डॉक्टर युवकाची आत्महत्या

भंडारा / प्रतिनिधी

          कष्ट करून मुलाला डॉक्टर बनविणाऱ्या आईवडिलांनी त्याच्या लग्नाची स्वप्न पाहिली होती. पण त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवले आहे हे परमेश्वरालाच माहीत. कारण लग्नाच्या आदल्या दिवशीच नवऱ्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने आईवडिलांवर शोककळा पसरली आहे. तर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुणाल भाऊराव चव्हाण 35 असे त्या युवकाचे नाव आहे.

कुणाल भाऊराव चव्हाण (35) हा स्नेहनगर तकिया वॉर्ड येथील रहिवासी होते. कुणाल चव्हाण  नागपूरच्या मेयो रूग्णालयात कर्तव्यावर होते.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट – 

कुणाल यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी कुणाल यांचं लग्न होतं. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मोठ्या उत्साहाने आईवडिलांनी कुणालंच लग्न ठरवले होते. मात्र बोहरल्यावर चढण्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली.

आईवडिलांना बसला धक्का-

घरात सर्वत्र लग्नाचा आनंद होता. उत्साही वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी मुलाचं लग्न असल्यानं आई-वडिलही खुशीत होते. सर्व सुरळीत सुरू असताना त्यांनी अचानक टोकाचं पाऊल उचल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close