राजकिय

आता शिवसेनेची वर्धा ते मुंबई  निष्ठा यात्रा

Spread the love

वर्धा  / प्रतिनिधी

                    राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कडून वर्धा ते मुंबई निष्ठा यात्रा काढण्यात आली आहे. ८६४ किलोमीटरचे अंतर नऊ दिवसात पूर्ण करीत ३१ डिसेंबरला मुंबईत मातोश्रीवर यात्रा पोहचणार आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे  युवा परिवर्तन संघटनेचे निहाल पांडे यांनी सांगितले
उध्दव ठाकरे यांना कपट करीत मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आले. त्यानंतर फुटी पडल्या. मात्र आम्ही ठाकरे यांनाच समर्थन देणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई, शेतकरी समस्या, घरकुल, आरोग्य, जर्जर उद्योग, याकडे लक्ष वेधलं जाणार आहे. वाटेतील प्रत्येक प्रमुख गावात कॉर्नर सभा घेतल्या जाणार आहे. या निष्ठा यात्रेत संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close