समाजसेवी नितीनजी कदम यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
वनअधिकारी यांनी सुटीच्या दिवशीही दाखवली सकारात्मक तत्परता
प्रतिनिधी/अमरावती
*काल शनिवार रोजी भातकुली तालुक्यातील कोलटेक गावाच्या शेतकऱ्याच्या बांधावर रानटी जनावरांचा वाढता उपद्रव व त्यामुळें झालेल्या शेतीचे अतोनात नुकसान पाहता समाजसेवी नितीनजी कदम यांनी थेट घटनास्थळ गाठून वास्तविकतेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसान संदर्भात माहिती दिली. या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तर आज शनिवार रोजी सकाळी नितीनजी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अधिकाऱ्यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही आपली कार्यतत्परता दाखवत घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. व लवकरात लवकर संबधीत शेतकऱ्याला मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले.*
*बडनेरा ग्रामीण येथील भातकुली परिसरामध्ये शेतकऱ्यांना मोठ्यप्रमाणात रानटी जनावरांच्या त्रासाला सामोरे जावून होणाऱ्या शेतीचे नुकसान नाईलाजाने सहन करावे लागतात. येथील लोकप्रतिनिधी कुंभकर्ण झोपेत असल्याचं नाटकं करून राष्ट्रीय राजकारणात गुंतायचा प्रामाणिक प्रयत्न करतात म्हणुन आम्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे आरोप या भागांतील शेतकरी करीत असुन त्यांच्याप्रती प्रचंड रोष बघायला मिळतो. परंतु समाजसेवी नितीनजी कदम शेतकरी चळवळीतला भाग असल्या कारणाने आपल्या वेगळ्या शेतकऱ्याप्रती विविध आंदोलनामुळे नेहमीचं चर्चेत असतात.त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकरी बांधवांना हक्काचं नेतृत्व मिळाल्याचं चित्र संपूर्ण भातकुली तालुक्यात दिसुन येत आहे.*
*समाजसेवी नितीनजी कदम व *संबधीत वणक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यतत्परता शैलीचे कौतुक सम्पूर्ण भातकुली परिसरातील शेतकरी बांधवांकडून होत आहे.*