अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार
माडगी येथील मुख्यचौकातील घटना
तुमसर / भंडारा : तुमसर तालुक्यातील तिरोडा गोंदिया राष्ट्रीय महामार्गांवरील माडगी येथील मुख्य चौकात अज्ञात पीकअप च्या धडकेत सायकल वरून जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दुपारी चार वाजता च्या सुमारास घडली.
सुखदेव राघो नवदेवे (वय ७०) रा. माडगी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सुखदेव राघो नवदेवे यांच्या सायकलला अज्ञात पीकअप वाहनाने जोरात धडक दिली.दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये नवदेवे हे माडगी रस्त्यावरील मुख्य चौकात काही अंतरावर जाऊन पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे
मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना तुमसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तुमसर पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.