एलसीबी ची गांजा विरोधात राज्यातील सगळ्यात मोठी कारवाई
महागाव तालुक्यातील घोनसरा घटना ; झाडे उपटण्यासाठी 30 मजूर
दुर्गम भाग असल्याचा आरोपींनी घेतला फायदा
यवतमाळ / अरविंद वानखडे
आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जातेय या ठिकाणी अनेक शेतामध्ये कपाशी आणि तुरीच्या पिकाच्या मधात गांजाची शेती या भागातील शेतकऱ्यांनी केली होती आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून गांजाचे शेती करणाऱ्यांना उघडकीस आणल आहे .
महागाव तालुक्यातील घोणसरा या भागामध्ये हा माळरान भाग आहे दुर्गम भाग आहे आणि त्या ठिकाणी या भागातील काही व्यक्ती मागील काही वर्षांपासून गांजाची शेती करत होते आणि पैशाच्या लालशेतूनच यांनी या भागात गांजाची शेती केली असल्याचेही बाब पोलीस तपासात पुढे आली आहे याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतला आहे आणि आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या या शेतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याचं आढळून आला आहे जून जुलै महिन्यात या गांजाची लागवड या भागातील व्यक्तींनी केली आणि आता हे गांजाचे पिक आहे हे फुलोऱ्यावर येत असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे खरंतर या भागामध्ये पोलिसांनी रात्रीपासूनच छापा टाकून ही गांजाची झाड जी उपटून टाकण्याचा काम सुरू केले आहे या भागातील साधारण 30 मजुरांना घेऊन हे गांजाचे झाड उपटून टाकण्याचे काम सकाळपासून सुरू करण्यात आला आहे मात्र अनेक ठिकाणी हे गांजाची लागवड करण्यात आल्यामुळे पोलिसांना या सर्व गांजा एकत्र करून तो पुसद पोलीस स्टेशनला नेण्याची कारवाई करावी लागणार आहे याप्रकरणी पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतला आहे आणि आतापर्यंत 25 लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याचा प्राथमिक तपासात पुढे आलेला आहे मात्र ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात या भागातील शेतकऱ्यांनी ही गांजाची लागवड केला होत्ता त्यावरून या ठिकाणी साधारण 20 एकर भागातील शेत शिवारात गांजाची शेती लागवड केल्याचे आढळून आले आहे साधारण 20 एकर परिसरामध्ये ही गांजाची लागवड करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे पोलिस, कृषी आणि महसूलचे यंत्रणा मिळवून ज्या ज्या शेतात गांजाची लागवड केली आहे त्या प्रत्येक शेतामध्ये जाऊन याची पाहणी करणार आहे आणि त्यामुळे या तपासणीला आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे आणि सध्या पोलीस या भागामध्ये मजुरांच्या साहाय्याने गांजाची झाड उपटून टाकण्याचे काम करीत आहे अनेक व्यक्ती आहे की ज्यांनी गांजाची लागवड या भागामध्ये केली आहे त्यांच्या शेतामध्ये तूर आणि कपाशीच्या मधोमध केली गांजा लागवड केला आहे त्यामुळे कपाशी मध्ये गांजा लावला का गांजामध्ये कपाशी लावली हे समजणे कठीण आहे
मात्र मोठ्या प्रमाणात हे गांजाची लागवड करण्यात आली महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी गांजा शेती वर कारवाई केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
ज्यांच्या सांगण्यावरून ही गांजा शेती करण्यात आली आणि या गांजा शेती ते विक्रीपर्यंत ज्यांची साखळी आहे त्यांना शोधण्याचा आवाहन करा पोलिसांसमोर आहे आता या प्रकरणी पोलिसांनी देविदास ठाकरे, वनदेव ठाकरे, सुखदेव ठाकरे व फळशींग राठोड यांना अटक केली आहे