क्राइम

आर जी कर च्या प्राचार्य ने केले  ट्रान्सजेंडर चे लैंगिक शोषण

Spread the love

आर जी कर च्या प्राचार्य ने केले  ट्रान्सजेंडर चे लैंगिक शोषण

कोलकाता  / नवप्रहार

          ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभर काहूर  माजलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपा नंतरही आंदोलन आणि निदर्शने सुरूच आहे. सीबीआय ने भ्रष्टाचाराच्या आरोपात आर जी कार मेडिकल कॉलेज चे प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली होती. आता पुन्हा त्यांना तृतीयपंथीयांच्या लैंगिक शोषण केल्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

सीबीआय घोष यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास करीत असताना त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने आता त्या प्रकरणातही औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यातच आता आरोपीवर ट्रान्सजेंडर व्यक्तींचं लैंगिक शोषण केल्याचा देखील गंभीर आरोप लावण्यात आलाय. तो ट्रान्सजेंडर्स व्यक्तींचा फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवत होता, व नंतर त्यांच्याशी संपर्क करून त्यांना स्वतःच्या घरी बोलवून लैंगिक शोषण करत होता. या प्रकरणी एका पीडित ट्रान्सजेंडरनं खुलासा केला असून सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

एका ट्रान्सजेंडरनं आरोपी घोष विरुद्ध तक्रार करताना गंभीर आरोप केलेत. मुर्शिदाबादमध्ये राहत असताना संदीप सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ट्रान्ससेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर्सचे फोन नंबर मिळवत होता. त्यानंतर तो त्यांना फोन करून स्वतःच्या घरी बोलावत असे, व रात्रभर त्यांच्याकडून घृणास्पद काम करून घेत असे. असा पीडित व्यक्तीनं आरोप केलाय. सीबीआयनं घोषला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानं आरोपी समोरील अडचणी वाढू शकतात.

एकामागून एक आरोप
आरोपी घोष याला आर. जी. कर हॉस्पिटल भ्रष्टाचार प्रकरणी सर्वात प्रथम सीबीआयनं अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (14 सप्टेंबर 2024) सीबीआयनं बलात्कार व हत्याप्रकरणातही त्याला औपचारिकरित्या अटक केली. आता आरोपीवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप होत आहेत. घोष हा काही काळ मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात कार्यरत होता. त्यावेळी तो ट्रान्ससेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीचं लैंगिक शोषण करत होता, असा आरोपही त्याच्यावर लावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

रात्रभर ट्रान्सजेंडरचे करायचा लैंगिक शोषण
पीडित ट्रान्सजेंडर व्यक्तीने घोष याच्यावर आरोप लावला आहे की, ‘मुर्शिदाबादमध्ये राहत असताना घोष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडरचा फोन नंबर मिळवत होता. त्यानंतर तो त्यांना स्वतःच्या घरी बोलवत असे, व रात्रभर ट्रान्सजेंडरवर लैंगिक अत्याचार करत असे. घोष याने आतापर्यंत अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी मी आता सीबीआयकडे तक्रार करणार आहे.’ दरम्यान, संदीप घोष याच्यावर हाँगकाँगमध्ये एका पुरुष नर्सचा विनयभंग केल्याचा देखील आरोप आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close