सामाजिक

नवविवाहितेने गमती गमतीत जीव गमावला 

Spread the love

जिंतूर / नवप्रहार मीडिया

              एका नवविवाहितेला गमंत करणे चांगलेच महागात पडले असून त्यात तिचा जीव गेला आहे. तिने नवऱ्याला बाहेर जाण्यापासून थांबवले आणि तसे केले तर जीव देईल अशी धमकी दिली.नवऱ्याने सुद्धा तिला गमतीतच हसून ठीक आहे असे म्हटले आणि तो घराबाहेर निघून गेला. इकडे बायकोला गमती गमतीत खरच फाशी लागली.

बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी येथील लक्ष्मण रामभाऊ काठमोरे व त्यांची पत्नी सायली (वय 19 वर्षे) हे नवविवाहित जोडपे पुणे येथे कामानिमित्ताने राहात होते. ते महालक्ष्मी सणासाठी गावाकडे आले होते.21 सप्टेंबरला सायंकाळी महालक्ष्मी मांडणे झाल्यानंतर सायलीला लक्ष्मण यांनी गणपतीकडे जातो असे म्हटले तेव्हा तुम्ही गणपतीकडे जाऊ नका मी फाशी घेईल असे सायलीने त्यांना सांगितले. लक्ष्मण यांनी हसत हसत घे फाशी असे म्हणात निघून गेले.

त्यानंतर सायलीने लक्ष्मण यास भीती घालण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यात अडकविला, मात्र तिचा त्यातच प्राण गेला. हा प्रकार सायलीच्या मृत्यूनंतरच कुटुंबियांना समजला. तिची प्राणज्योत मावळल्याने काठमाेरे कुटुंबावर दुखाचा डाेंगर काेसळला.

दरम्यान  माहिती मिळल्यावर घटनास्थळी बामणी पोलीस स्टेशनचे कृष्णा घायवट (सपोनी), जमादार सुभाष चव्हाण ,जमादार वसंत निळे यांनी पंचनामा करून मयत सायलीचे शविच्छेदन (22 सप्टेंबरला) जिंतूर येथील शासकीय दवाखाना येथे केले. सायलीच्या आई-वडिलांचे जबाब बामणी पोलिसांनी घेतले. त्यामध्ये त्यांनी आक्षेप न घेतल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close