हटके

परीक्षे ऐवजी ती देत होती प्रेमाची परीक्षा ; पतीने रंगेहाथ पकडले

Spread the love

             सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही असे असतात की ते विचार करायला भाग पाडतात. हा व्हिडीओ नवरा आणि बायकोच्या नात्याला तडा कसा जातो हे दाखविणारा आहे. यात बायको आपल्या नवऱ्याला परीक्षेला जायचे असल्याचे कारण सांगून घराबाहेर पडते आणि नवरा तिला बॉयफ्रेंड ओबात रंगेहाथ पकडतो.

               वर्तमान काळात विवाह बाह्य संबंधात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मग तो पुरुष असो  वा महिला  त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर येत असते. आपला जोडीदार आपल्याला फसवून दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचे समजल्यास मोठा धक्का बसतो. अनेक व्यक्ती या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये जातात. अशात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या पतीला परीक्षेला जात आहे असं सांगून घराबाहेर पडली.

हे पाहून पती फार भडकला. जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिने आपल्याला फसवलं, असा विचार करत त्याने आपल्या मोबाईमध्ये पत्नीची वागणूक कैद केली. व्हिडीओ बनवत असं वागण्याचा तिला जाब विचारला. तसेच भररस्त्याच गोंधळ घातला.मात्र परीक्षेला न जाता ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत फिरत होती. महिलेच्या पतीला पत्नीचा संशय आला होता. त्यामुळे तो तिचा पाठलाग करू लागला. रस्त्यावर पत्नीला शोधत असताना आपली पत्नी परपुरुषासोबत असल्याचं त्याला दिसलं. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरत होती.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. अशा महिलांना कडक शिक्षा केली पाहिजे असं काहींनी म्हटलं आहे

.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close