क्राइम

कोरोना काळात पती गमावलेल्या महिले कडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण 

Spread the love

संबंधा दरम्यान मुलावर व्हिडीओ बनवण्यासाठी तैनात होती दबाब

पुणे / नवप्रहार मीडिया 

            पुरुषांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषण झाल्याच्या बातम्या नेहमीच घडत असतात. पण परदेशात सोडले तर भारतात महिलांकडून अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची घटना क्वचितच घडते,.परंतु कोंढवा येथे एका महिलेकडून 17 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार पीडित मुलाच्या तक्रारी नंतर उघड झाला आहे,.  या महिलेच्या पतीचे कोरोना काळात  निधन झाल्यानंतर तिने या मुलाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. आणि स्वतःच्या मोबाईल मध्ये याचा व्हिडीओ देखील बनवले होते. 

पीडित 17 वर्षाच्या प मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 28 वर्षीय महिलेवर पोक्सो कलम (Pocso Act) 3, 4, 5 (एन), 5(एल), 6 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 1 मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत कोंढवा बु. येथे दोन ते तीन वेळा घडला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा आणि आरोपी महिला कोंढवा बु. परिसरात राहतात. दोघांची घरे जवळजवळ असून महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दरम्यान, फिर्यादी मुलगा हा अल्पवयीन आहे. याची माहिती असतानाही आरोपी महिलेने त्याच्यासोबत जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसात देण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी मुलाची इच्छा नसताना जबरदस्तीने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले.

आरोपी महिलेने अल्पवयीन मुलासोबत शरीर संबंध ठेवत असताना व्हिडिओ चित्रितकरण्यास भाग पाडले.
मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत आरोपी महिलेने दोन ते तीन वेळा जबरदस्तीने मुलासोबत शरीर संबंध ठेवले. दरम्यान, आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडीओ असल्याचे समजताच मुलाने हा प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबर  करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close