हटके

ऑनलाईन गेमिंग मध्ये खूप पैशे कमावण्याचे लालच भोवले उचलले धक्कादायक पाऊल

Spread the love

गोंदिया / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                  युवकांमध्ये कमी कालावधीत जास्त पैशे कमावण्याचे फॅड असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ते शॉर्टकट  मार्गाचा अवलंब करतात. त्यासाठी आता ऑनलाईन गेमिंग हा पर्याय युवकांपूढे आहे. सुरवातीला ऑनलाईन गेमिंग मध्ये खूप पैसा कमावला. त्यानंतर त्याने पैशे कमावण्याच्या नादात डोक्यावर कर्जाचा डोंगर करून घेतला आणि ते फेडण्याचा चिंतेत गळफास लावून जीवन संपवले.

ऑनलाइन बेटिंग च्या माध्यमातून तरुणाने आधी पैसे कमावले. त्यानंतर या जुगारात कर्ज काढून पैसे गुंतवले. त्यानंतर कर्जाचा डोंगर दीड कोटींच्या वर गेल्यावर हताश झालेल्या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नीरज कुमार मानकानी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. गोंदिया शहरातील श्रीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

नीरज क्रिकेट सामन्यावर पैसे गुंतवून जुगार खेळत होता,त्याने या ऑनलाइन सट्टेबाजीत खूप पैसे गुंतवले होते. सुरुवातील त्याने या माध्यमातून खूप पैसे कमावले होते. त्यानंतर त्याला या खेळाची चटक लागली. सट्टेबाजीत जवळपास दीड कोटी रुपये हरल्यानंतर तो कर्जबाजारी झाला होता. कर्जाच्या वसुलीसाठी सट्टेबाज त्याला धमकी देत होते.त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नसल्याने नीरजने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नीरजच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून तो आईसोबत गोंदियामध्ये राहतो. त्याचा एक भाऊ अमरावतीमध्ये राहतो. शुक्रवारी नीरजची आई नागपूरला गेल्यानंतर घरी एकटा असलेल्या नीरजने आत्महत्या केली. शेजारचे मित्र घरी आल्यानंतर त्यांना नीरजचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला.

ऑनलाईन गेमिंग सट्टेबाजीत नीरजच्या सोबत कोण गुंतले होते, आणि कोणामुळे नीरजने आत्महत्या केली, की त्याची हत्या करून आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला? याचा तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close