अन मंदिरात घुसलेले वाघीण, सिंह पाहून पुजाऱ्याची पाचावर धारण
गुजरात / नवप्रहार मीडिया नेटवर्क
हिंस्त्र वन्य प्राण्यांच्या गावात घुसण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे प्राणी पाळीव प्राण्यांची शिकार करतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ ने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.या व्हिडिओत सिंहाचा कळप शिव मंदिरात घुसला असल्याचे दिसत आहे.हे दृश्य पाहून पुजाऱ्याची पाचावर धारण बसली आहे. पुजाऱ्याने मंदिराचे दार लावत स्वतःचे रक्षण केले आहे.त्यांना पाठविण्यासाठी त्याने विविध आवाज देखील काढले आहेत.
शिव मंदिरात सिंहाचा कळप आल्याची घटना गुजरातमधीम समोर आली आहे. गुजरातच्या गीर जंगलात सिंहांची संख्या चांगली आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. काहीवेळा परिसरातील वन्य प्राणी आजूबाजूच्या गावात तर कधी रस्त्यांवरही दिसतात. सध्या समोर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिव मंदिरात काही सिंह, सिंहिण घुसले.
त्यावेळी मंदिरात पुजारीही उपस्थित होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुजाऱ्याने मंदिराच्या दरवाजांना कुलुपही लावले. जेणेकरुन हे भयानक प्राणी आत येऊ नये. प्राण्यांनी तेथून पळ काढावा म्हणून पुजाऱ्याने वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली.
यावेळी त्यानं कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैदही केलं. पुजाऱ्याची ही युक्ती कामी आली आणि हा प्राण्यांचा कळप परत गेला. @abhaysinh_g नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत युजरने लिहिलं की, सिंहीण तिच्या 2 शावकांसह मंदिरात पोहोचली होती.
तिघेही बराच वेळ मंदिराच्या आवारात फिरत राहिले. सिंह येत असल्याचं पाहून पुजाऱ्याने सर्व दरवाजे आधीच बंद केले होते, जेणेकरून ते आत येऊ नयेत. यानंतर इकडे तिकडे फिरत असताना एक शावक ग्रीलच्या अगदी जवळ आले. मग, समजूतदारपणा दाखवत, शावकाचे लक्ष विचलित व्हावे आणि तो परत जावा म्हणून पुजाऱ्याने वेगवेगळे आवाज काढले.
दरम्यान, गीर आणि आसपासच्या भागात या धोकादायक प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. धोकादायक प्राण्यांच्या वावरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.