क्राइम

विकृतीचा कळस ; गर्भवती शेळीवर तीन तरुणांचा बलात्कार

Spread the love

वैशाली  / नवप्रहार डेस्क 

                   इंटरनेट च्या या काळात अश्लील साहित्य ऐका क्लिक वर उपलब्ध होत असल्याने मूल वेळेपूर्वी वयात येऊ लागली आहेत. त्यामुळे ती वाम मार्गाकडे लवकर वळत आहेत. अशी मुले नशेच्या आहारी जाण्या सोबत कुटुंबाला लाजेने मान खाली करणारे कृत्य देखील करत आहेत. तीन तरुणांकडून गर्भवती शेळीवर बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद आणि लाजिरवाणा  प्रकार घडला आहे. 

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. तीन युवकांनी गर्भवती असलेल्या शेळीवर सामूहिक बलात्कार केला. शेळीचं ओरडणं ऐकू येताच काही जण त्या ठिकाणी गेले. लोकांना पाहून दोन युवक फरार झाले, तर एकाला ग्रामस्थांनी पकडले. त्याला ग्रामस्थांनी चोप दिला. या प्रकारामुळे शेळीची स्थिती गंभीर झाली होती. तिच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. शेळीवर व्हेटर्नरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना वैशाली जिल्ह्यात घडली. घटनेवेळी शेळी जोरात ओरडत असल्याने तिचा आवाज ऐकून लोक जमा झाले. तेवढ्यात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं पकडलेल्या आरोपीने सांगितलं. हे ऐकून लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कदम चौकाजवळ तीन युवकांनी शेळीवर सामूहिक बलात्कार केला. ही शेळी गर्भवती होती. युवकांनी आळीपाळीने बलात्कार केल्याने ती रक्तबंबाळ झाली होती. शेळीचं विव्हळणं ऐकून लोक झुडपाजवळ पोहोचले. त्यांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. लोकांनी त्यापैकी एका आरोपीला पकडलं, तर बाकीचे पळून गेले.

पकडलेल्या आरोपीला लोकांनी खुर्चीला बांधून ठेवलं. सोनू कुमार असं त्याचं नाव आहे. सोनूने सांगितलं, की त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ताडी प्यायली होती. ताडीच्या नशेत त्यांनी हे दुष्कृत्य केलं. आरडाओरडा होताच त्याचे दोन साथीदार फरार झाले. त्यापैकी एका साथीदाराचं नाव अविनाश आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या लोकांनी एका आरोपीला पकडल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनूला पोलीस स्टेशनला आणलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close