क्राइम
डॉक्टर बनवत होता दवाखान्यात आलेल्या महिला, तरुणी आणि बालकांचे नग्न व्हिडीओ

डॉक्टर पतीच्या त्या कृत्याचा पत्नीनेच केला पर्दाफाश
अमेरिका / नवप्रहार डेस्क
भारतीय डॉक्टरने अमेरिकेत केलेल्या अश्लील कृत्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.अमेरिकन पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी एका 40 वर्षांच्या भारतीय डॉक्टरला अटक केली आहे. अटक केलेल्या भारतीय डॉक्टरचं नाव ओमेर एजाज असं आहे.
ओमेर एजाजवर लहान मुले आणि महिलांचे नग्न व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. दोन वर्षांतील मुलांचे आणि महिलांचे शेकडो नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मात्र, हे प्रकरण दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वत:च्या बायकोने उघडकीस आणलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी डॉक्टरने कथितपणे बाथरूम, चेंजिंग एरिया, हॉस्पिटल रूम आणि अगदी घरात देखील छुपे कॅमेरे लावले होते. आरोपी डॉक्टरने बेशुद्धावस्थेत किंवा झोपलेल्या अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवत होता, असा खुलासा करण्यात आला आहे.
झालं असं की, पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. पतीचं एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर असल्याचा संशय बळावल्याने पत्नीने तपास सुरू केला. त्यावेळी पत्नीच्या हाती एक हार्ड ड्राईव्ह सापडली. पत्नीने हार्ड ड्राईव्ह चेक केल्यानंतर तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आपला पती अश्लील कृत्य करत असल्याचं लक्षात येतात तिने धाडसी निर्णय घेतला अन् थेट पोलिसांना कळवलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली अन् आरोपी डॉक्टरला अटक केली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी डॉक्टरचं हे कृत्य सुरू होतं, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. अत्याचार इतका व्यापक आहे आणि विकृती खूप मोठी आहे. आम्ही आणखी खोलात जाऊन तपास करत असून तातडीने कारवाई केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. हा आरोपी डॉक्टर 2011 मध्ये भारतातून वर्क व्हिसावरून अमेरिकेत गेला होता. त्यानंतर त्याने नागरिकत्व मिळवलं.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |