शाशकीय

नोटा मोजता मोजता नोटा मोजायच्या मशिन्स ही पडल्या बंद

Spread the love

                    आयकर विभागाच्या धाडीत ईतक्या नोटा सापडल्या की नोटा  मोजता मोजता नोटा मोजायच्या मशिन्स देखील बंद पडल्या. हा करिश्मा आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशा हेतहील बौद्ध डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मारलेल्या धाडी नंतर घडला. या छापेमारीत आयकर विभागाने जप्त केलेली रोकड इतकी आहे की, मोजणी करता करता चक्क नोटा मोजण्याची मशिनच बंद पडली.

आयकर विभागाच्या या कारवाईची चर्चा होत आहे.

आयकर विभागाने ओडिशातील बोलंगीर, संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा येथील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे. ही छापेमारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत या छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेपैकी तब्बल 50 कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर नोटा शिल्लक होत्या. नोटांची संख्या इतकी जास्त होती की, नोटा मोजण्यासाठी आणलेल्या मशीनही बंद पडल्या.

बुधवारी सकाळपर्यंत आयकर विभागाच्या पथकाने 50 कोटी रुपये जप्त करून त्यांची मोजणी केली. यावरुनच आयकर विभागाच्या छापेमारीत किती मोठी रोकड सापडली आहे याचा अंदाज येतो. अद्याप छापेमारी सुरू आहे. बौद्ध डिस्टिलरीज सोबतच झारखंडचे प्रसिद्ध उद्योगपती आणि व्यापारी रामचंद्र रुंगटा यांच्या घरावरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. रामगढ, रांची आणि इतर ठिकाणांसह रुंगटा यांच्या निवासस्थानावर आणि प्रतिष्ठानांवर छापेमारी करत आहेत. रामगड आणि रांची येथील रामचंद्र रुंगटा येथील अनेक ठिकाणी सर्वेक्षण सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे

सीआरपीएफचे जवान येथे आयकर अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगढ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी कारखाने आणि निवासस्थानांची चौकशी सुरू आहे. रामगढ शहरातील पंजाब नॅशनल बँकेजवळ असलेल्या रामचंद्र रुंगटा यांच्या निवासी कार्यालयात सकाळपासूनच अधिकारी एकत्र आले आणि कारवाई सुरू केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close